News Flash

महेश भट्टने शेअर केला त्यांच्या निडर मुलीचा फोटो

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यादरम्यान अलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले

छाया सौजन्य- ट्विटर

ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलीसाठी म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्टसाठी यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार फार खास होता असे म्हणायला हवे. ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये अभिनेत्री आलिया भट्टला ‘उडता पंजाब’ या चित्रपटात तिने केलेल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आलियाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या सर्वांमध्ये सर्वात जास्त आनंदात आणि उत्साहात होते ते म्हणजे आलियाचे वडिल महेश भट्ट. आलियाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर लगेच दुस-या दिवशीच्या सकाळी महेश भट्ट यांनी चेहऱ्यावर स्मित असलेल्या, शांतपणे झोपी गेलेल्या आलियाचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला.

महेश भट्ट यांनी आलियाचा आणखी एक फोटो ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी आलियाची प्रशंसा करणारे आणि तिला प्रोत्साहित करणारे असे कॅप्शनही लिहिले होते. आलियाला उद्देशून त्यांनी लिहिले होते की, ‘एकदा का तू निडर झालीस की आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी सीमा राहात नाहीत. माझ्या महान पण तितक्याच मोठ्या मुलीचे खूप खूप अभिनंदन.’ आलिया भट्ट, शाहिद कपूर, करिना कपूर, दिलजित दोसांज यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाने फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये चांगलेच यश संपादन केले आहे. या चित्रपटात साकारलेल्या भूमिकांसाठी अभिनेता शाहिद कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा समीक्षक पसंतीचा पुरस्कार तर दिलजित दोसांजला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

अभिनेता शाहिद कपूर आणि दिलजित दोसांजने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही पुरस्कारांसंबंध आनंद व्यक्त करणारे ट्विट केले होते. शाहिद कपूरने ट्विट करत आलिया आणि दिलजितला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले. ‘उडता पंजाब’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्टने एका बिहारी मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये ड्रग्स, पंजाब, राजकारण, स्थानिक वातावरण या सर्व घटकांभोवती फिरणाऱ्या कथानकाचे चित्रण करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 11:01 am

Web Title: after winning filmfare award mahesh bhatt tweets a photo of alia bhatt and congratulate her
Next Stories
1 ब्रेकअपनंतर कधी एक्स बॉयफ्रेण्डला किस केलेस का?
2 ऋषी कपूरने दाऊदची भेट घेतल्याचा खुलासा
3 सिने ‘नॉलेज’: ‘बॉक्सर’मध्ये मिथुनला कोणी दिली होती फाइट?
Just Now!
X