News Flash

झायरा वसिम, सना खान नंतर ‘या’ अभिनेत्याने मनोरंजन सृष्टीला केला रामराम

झायरा वसिम आणि सना खान नंतर या अभिनेत्याने केला मनोरंजनसृष्टीला रामराम, पाहा काय म्हणाला तो..

(Photo credit : sakib khan instagram)

अभिनेत्री झायरा वसिम आणि सना खाननंतर आता एका अभिनेत्याने ग्लॅमरस वर्ल्ड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एमटिव्ही ‘रोडिज रेव्होल्युशन’मधून लोकप्रिय झालेला रोडिज स्पर्धक आणि मॉडल साकिब खानने इस्लामसाठी मनोरंजनसृष्टी आणि ग्लॅमरस वर्ल्डला सोडलं आहे. धर्म आणि इस्लामच्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. साकीबने सोशल मीडियातून याची माहिती दिली.

साकीबनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. “तुम्ही सगळे ठिक आहात अशी मला आशा आहे. आजची पोस्ट ही एका घोषणेसाठी आहे. मी आजपासून मनोरंजनसृष्टीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात मी मॉडेलिंग आणि अभिनय करणार नाही. माझ्याकडे काम नाही किंवा मी हार मानली, असं नाही. माझ्याकडे खूप चांगले प्रोजेक्ट्स होते. फक्त अल्लाहची इच्छा नव्हती. फक्त काही तरी चांगल माझ्या नशिबात अल्लाहने लिहिलं असेल. इंशा अल्लाह” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे तो म्हणाला,”तो सर्वोत्कृष्ट नियोजक आहे. मी मुंबईत संघर्ष पाहिला आहे. इथं जगणं कठिण आहे. परंतु एका वर्षापेक्षा कमी कालावधीतही मी चांगली प्रसिद्धी आणि चाहते मिळवले, पण ते जगासाठी आणि मृत्युनंतरच्या जीवनासाठी काहीच नाही. मला काही कळतं नव्हतं आणि मी इस्लामच्या विरोधात जात होतो. मी नमाज पठण करायचो तरी सुद्धा काही कमतरता जाणवत होती आणि ती शांतता आणि अल्लाहबद्दलची माझी जबाबदारी होती. तर आता मी पूर्णपणे अल्लाहला शरण जातं आहे. जी शांतता होती ती आता माझ्या समोर आहे, ते म्हणजे माझं कुराण.”

पुढे तो म्हणाला, “मी अल्लाहचा आभारी आहे की त्याने मला पश्चात्ताप करण्याची आणि मनापासून मला स्वीकारण्याची संधी दिली. कारण मला माझ्या आयुष्यात चमत्कार घडताना दिसत आहेत.” साकिब एक वकील होता, त्याच दरम्यान त्याने रोडिज रेव्होल्युशनमध्ये स्पर्धक म्हणून एण्ट्री केली होती. शोमध्ये आल्यानंतर त्याने त्याची ओळख “मी काश्मिरचा असून, मी दगड फेकणारा नाही” अशी केली होती. मुंबईतील लोकांच्या मनात काश्मिरी लोकांचे जे चित्र आहे ते बदलण्यासाठी तो मुंबईत आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 2:52 pm

Web Title: after zaira wasim and sana khan reality tv contestant sakib khan quits showbiz to follow his faith islam religion dcp 98
Next Stories
1 लग्नासाठी प्राची देसाईने ठेवली अट, म्हणाली…
2 पैलवान अनुष्का! चक्क विराटलाच उचललं….हा व्हिडिओ पहा!
3 ‘चिट्टीया कलाईया’ गर्लचा नवा चित्रपट; लंडनमध्ये चित्रीकरण
Just Now!
X