News Flash

अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली…

नुकताच अगस्त्यने इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे.

सध्या अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. तसेच हे स्टारकिड्स सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आता या यादीमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचा देखील समावेश झाला आहे. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. त्याने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. दरम्यान या पोस्टवर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, नव्या नंदा यांनी देखील कमेंट केल्या आहेत.

नुकताच आगस्तने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. या फोटोवर मला पुढे जाण्यात रस आहे, नशिबावर माझा फारसा विश्वास नाही या आशयाचे कॅप्शन लिहिले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Agastya Nanda (@agastya.nanda) on

नव्याने आगस्तच्या या पोस्टवर कमेंट करत ‘कृपया स्पष्टीकरण दे’ असे म्हटले आहे. त्यावर आलिया भट्टने देखील कमेंट करत खरं आहे. कृपया स्पष्टीकरण दे असे म्हटले आहे. शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहानाने देखील अगस्त्यच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. तिने “unfollowing” असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 3:10 pm

Web Title: agastya nanda makes his insta debut avb 95
Next Stories
1 प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर ‘राधेश्याम’ची भुरळ; ४ दिवसात रचला ‘हा’ इतिहास
2 …तेव्हा समजलं बिग बी अन् माझ्यातलं अंतर; शाहरुखने सांगितला ‘मोहब्बतें’च्या सेटवरचा अनुभव
3 आता श्रद्धा कपूर साकारणार ‘इच्छाधारी नागिण’
Just Now!
X