News Flash

अग्गंबाई सासूबाई : सोहमच्या बेलगाम वागण्याला आसावरी देणार चपराकीने उत्तर

आसावरीचा हा रुद्रावतार पाहून सर्वचजण चकीत होतात.

अग्गंबाई सासूबाई

छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. अभिनेत्री तेजश्री प्रधानने या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेत दररोज नवनवीन घटना घडतच आहेत. होळीच्या निमित्ताने मालिकेत रंजक वळण येणार आहे.

मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये कुलकर्णी कुटुंबीय अभिजीत राजेंसोबत अत्यंत उत्साहात होळी साजरी करतात. धुळवडीची मज्जा सुरू असतानाच शुभ्रा ही सोहम आणि प्रज्ञाला एकत्र पाहते. सोहम आणि प्रज्ञा एकाच रुममध्ये असतात आणि तितक्यात शुभ्रा त्यांना पाहते. सोहमला ती याचा जाबही विचारते. यावेळी सोहम आणि शुभ्रा यांच्यात बाचाबाची होते. शुभ्राला कानाखाली मारण्यासाठी सोहम हात उचलतो, तितक्यात आसावरी सोहमला थांबवते आणि त्याच्या कानशिलात लगावते. आसावरीचा हा रुद्रावतार पाहून सर्वचजण चकीत होतात. त्यामुळे मालिकेत यापुढे काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आणखी वाचा : ‘हा’ आहे बॉलिवूडचा सर्वांत महागडा अभिनेता; एका जाहिरातीसाठी घेतो इतके कोटी रुपये मानधन 

होळीनिमित्त या विशेष एपिसोडसाठी मालिकेच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. मालिकेत येणाऱ्या या रंजक वळणामुळे टीआरपी वाढण्याची शक्यता आहे. वेगळं कथानक असलेल्या या मालिकेत तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ, गिरीश ओक, आशुतोष पत्की, रवी पटवर्धन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 1:51 pm

Web Title: aggabai sasubai asawari to slap soham during holi celebrations ssv 92
Next Stories
1 ‘बधाई हो’च्या सीक्वेलमध्ये दिसेल ‘ही’ हटके जोडी
2 मराठी मालिकेच्या शीर्षकगीतावर शिल्पाचा टिक-टॉक अंदाज, व्हिडीओ व्हायरल
3 ..म्हणून आजवर करिश्मासोबत केलं नाही काम- करीना कपूर खान
Just Now!
X