News Flash

हे आहे बबड्याचं ‘क्वारंटाइन शेड्युल’

हे कलाकार घरी आपल्या वेळ कसा घालवत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.

आशुतोष पत्की

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. हे कलाकार घरी आपल्या वेळ कसा घालवत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे घराघरात बबड्या म्हणजेच सोहम या व्यक्तिरेखेची चर्चा असून या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता आशुतोष पत्की याचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. बबड्या म्हणजेच आशुतोष त्याचा वेळ घरी कसा घालवतो याबद्दल बोलताना तो म्हणाला, “हा २१ दिवसांचा लॉकडाऊन म्हणजे सरकारने आपल्या संरक्षणासाठी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे आपण घरी राहून त्यांना सहकार्य करायला पाहिजे. मी घरी माझा वेळ माझ्या घरच्यांसोबत घालवतोय. या मोकळ्या वेळात मी अनेक गोष्टी शिकायचा प्रयत्न करतोय. सध्या मी स्वयंपाक शिकतोय. वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करतोय. घरच्यांना त्यांच्या कामात मदत करतोय, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतोय. या वेळेत आपण अनेक छान वेब-सीरीज किंवा चित्रपट बघू शकतो. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चित्रपट बघतो. हे माझं क्वारंटाईनचं शेड्युल बनलंय.”

आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. वडिलांमुळे म्हणजेच संगीतकार अशोक पत्की यांच्यामुळे अशुतोषला संगीताचाही वारसा लाभला आहे; परंतु त्याने संगीतात न रमता वेगळी वाट निवडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 9:47 am

Web Title: aggabai sasubai fame ashutosh patki aka babadya quarantine schedule ssv 92
Next Stories
1 Coronavirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या निर्मात्याच्या मुलीची दुसरी करोना चाचणी निगेटीव्ह
2 रामायणात ‘मंथरा’ साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं ‘या’ घटनेनं बदलले संपूर्ण आयुष्य
3 सोनाक्षीला पाठिंबा देत शत्रूघ्न सिन्हा यांचा मुकेश खन्ना यांना टोला
Just Now!
X