12 November 2019

News Flash

‘अग्गंबाई सासूबाई’मधील विश्वासबद्दल तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?

'तुला पाहते रे' मालिकेतही केलं होतं काम

छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासूबाई’ हा मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात या मालिकेला तब्बल नऊ पुरस्कार मिळाले. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या मालिकेत विश्वासची भूमिका साकारली अभिनेता भाग्येश पाटील याने. या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. भाग्येशने याआधीही काही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

विशेष म्हणजे त्याची भूमिका असलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिकासुद्धा अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. या मालिकेत त्याने पत्रकाराची छोटी भूमिका साकारली होती. यासोबतच ‘हम बने तुम बने’, ‘हे विठ्ठला’ यांतही तो महत्त्वपूर्ण भूमिकेत होता.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत विश्वासने साकारलेली व्यक्तीरेखा अभिजीत राजेंच्या जवळची आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून टीआरपीच्या यादीतही मालिका पहिल्या पाच स्थानांत पोहोचण्यात यशस्वी ठरली आहे.या मालिकेमध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यात तेजश्रीने शुभ्रा ही भूमिका साकारली आहे. तर आशुतोष बाबड्या उर्फ ‘सोहम’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

First Published on October 23, 2019 11:33 am

Web Title: aggabai sasubai marathi serial bhagyesh patil role as vishwas winning hearts ssv 92