गेल्या वर्षभरापासून अग्गंबाई सासूबाई ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कथानकात दरवेळी येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आली आहे. पत्नीच्या प्रेमापोटी अभिजीत राजेंनी त्यांच्या संपत्तीवर पाणी सोडून ते चाळीत रहायला आले आहेत. विशेष म्हणजे या कठीण प्रसंगातदेखील ते आसावरीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांनी आसावरीचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला.
शून्यातून पुन्हा विश्व उभं करण्यास सज्ज झालेल्या आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या वाढदिवस योगायोगाने एकाच दिवशी आहे. त्यामुळे या दोघांनीही साध्या पद्धतीने पण तितक्याच उत्साह हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
आलेलं संकट विसरुन अभिजीत राजे आसावरीला आनंदी ठेवण्यासाठी तिला सरप्राइज देतात. ते संपूर्ण चाळीला लायटींग करतात आणि चाळीतली नव्या कुटुंबासोबत हा वाढदिवस साजरा करतात. त्यामुळे आसावरीसाठी यंदाचा वाढदिवस खास झाल्याचं दिसून येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 26, 2020 4:52 pm