06 August 2020

News Flash

Photo : ‘बबड्या’ लवकरच येतोय तुमच्या भेटीला

'अग्गंबाई सासूबाई'चे नवीन एपिसोड लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळतील. 

मालिका आणि प्रेक्षक यांचं एक अतूट नातं असतं. काही मालिका या अशा असतात की ज्या वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. तर काही अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. अशीच एक मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’. जवळपास तीन महिन्यांनंतर शूटिंगला सुरुवात झाल्याने छोट्या पडद्यावरील कलाकारांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून बबड्या उर्फ आशुतोष पत्कीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे.

“लवकरच येतोय पुढची गोष्ट घेऊन. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात!”, असं लिहित त्याने सेटवरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ व आशुतोष पत्की दिसतोय.

आणखी वाचा : डॉक्टर ते अ‍ॅक्टर…निलेश साबळेनं दिला आठवणींना उजाळा

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यात तेजश्रीने शुभ्रा ही भूमिका साकारली आहे. तर आशुतोष बाबड्या उर्फ ‘सोहम’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. अल्पावधीच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. आता या मालिकेचे नवीन एपिसोड लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 11:45 am

Web Title: aggabai sasubai shoot resumes ashutosh patki shares behind the scene pictures ssv 92
Next Stories
1 “थप्पड नहीं काम से मारो”; अनुभव सिन्हांच्या ‘त्या’ ट्विटवर प्रियांकाची प्रतिक्रिया
2 Video : ‘पवित्र रिश्ता’मधील सुशांत-अंकिताचं प्रदर्शित होऊ न शकलेलं गाणं व्हायरल
3 “टीकेमुळे मी विचलित होत नाही”; पूजा भट्टने ट्रोलर्सवर साधला निशाणा
Just Now!
X