19 October 2020

News Flash

अग्गंबाई सासूबाई : आता अभिजीत होणार बबड्या?

जाणून घ्या, मालिकेत पुढे काय घडणार?

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचे नवीन एपिसोड्स नव्या कथानकासह सुरू झाले आहेत. या कथानकात दररोज नवनवीन वळणं येत असून ही मालिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय. आता मालिकेच्या पुढील भागात अभिजीत (गिरीश ओक) आणि शुभ्रा (तेजश्री प्रधान) मिळून आसावरीसाठी नवीन प्लॅन आखताना दिसणार आहेत. आईच्या लाडामुळे बबड्या अर्थात सोहम (आशुतोष पत्की) कशाप्रकारे बिघडला आहे, हे अभिजीव व शुभ्रा मिळून आसावरीला मजेशीर पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करणार आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील भागात अभिजीत आसावरीसोबत सोहमसारखेच (बबड्या) वागणार आहेत. अभिजीत यांचं उद्धट वागणं पाहून आसावरीला आश्चर्याचा धक्का बसतो. दुसरीकडे सोहमसुद्धा आसावरीचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. नंतर अभिजीत आसावरीची माफीदेखील मागतात. पण त्यावर आसावरीची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आणखी वाचा : ‘अग्गंबाई सासूबाई’वर भन्नाट मीम्स व्हायरल; तुम्हीही पोट धरून हसाल

‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीतही अग्रस्थानी असून सोशल मीडियावरही त्याची भरपूर चर्चा असते. या मालिकेत निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 4:48 pm

Web Title: aggabai sasubai spoiler alert abhijeet to make asawari realize soham tantrums ssv 92
Next Stories
1 पाकिस्तानी अभिनेता साकारणार सुशांतची भूमिका?
2 लॉकडाउनमध्ये रिकामटेकड्या लोकांमुळे वाढतंय ट्रोलिंग- सोनाक्षी सिन्हा
3 पाच वर्षांनंतर अभिनेत्री सोडणार ‘भाबीजी घर पर है’ मालिका, निर्माते म्हणाले…
Just Now!
X