छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘अग्गंबाई सासुबाई’. या मालिकेचा आता पुढचा भाग ‘अग्गंबाई सूनबाई’ काही दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. या मालिकेत अभिजीत राजे ही भूमिका डॉ. गिरीश ओक साकारत आहेत. मालिकेचं हे पर्व नुकतचं सुरू झाल्याचा आनंद घेत नाही तो पर्यंत त्यांच्यांवर दु:खाचं आभाळ कोसळलं आहे. गिरीश ओक यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यानंतर त्यानी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांच्या भावना मांडल्या आहेत.

त्यांची ही कविता वाचून कोणाचे ही मन भरून येईल. अशी कविता लिहत त्यांनी त्यांच्या भावना सगळ्यांसमोर मांडल्या आहेत. त्यांची ही कविता वाचून त्यांचे चाहते भावूक झाले असून त्यांनी ही डॉ. ओक यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.

“सौ शशीकला रत्नाकर ओक”
माझी आई जन्म २२ सप्टेंबर १९३७ परवाच २१ मार्च २०२१ ला मला आत्मनिर्भर करून गेली आणि कधीतरी कोणाचं तरी सांत्वन करण्यासाठी मीच केलेली ही कविता माझंच सांत्वन करायला धावून आली आणि माझ्यात सकारात्मकता भरून गेली.
—————————
” इथला धीर पुरेनासा होतो
इथलं औषध लागेनासं होतं
इथली हवा मानवेनाशी होते
मग जगण्याची इच्छाच नाहीशी होते
बट डोन्ट से द पेशंट ईझ डेड
बट द पेशंट ईझ ट्रान्सफर्ड टू सूपर आय सी यू
तिथला धीर खोटा खोटा नसतो
अमृत फार्मास्युटिकल्सच्या औषधांमधे भेसळ नसते
अहो क्वॅालिटी कंट्रोल बोर्डावर चक्क अश्विनी कुमार बसलेले असतात नं !
आणि हवं नको ते बघायला मुलं नातवंडं नाही तर चक्क आई बाबा आजी आजोबा खापर खापर सगळेच
तिथल्या हवेत पोल्यूशन नसतं
सगळंच कसं इथल्या पेक्षा अपग्रेडेड असतं
तिथे जगण्या साठी शरीराची गरजच नसते
मग ते थकलं काय नी नसलं काय
फक्त इथल्या आय सी यू च्या दाराच्या काचेतून तुम्ही पेशंटला बघू शकतात हेल्पलेसपणे
ती सोय (?) सूपर आय सी यू ला नाही
पण काळजी करू नका
केस आता
खुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात आहे
सो डोन्ट वरी ”
—————————
“आई” तू आमच्या समोर नसणार आहेस पण आमच्या पाठीशी असणार आहेस माहितीये आम्हाला.

दुर्गा पल्लवी गिरीश.

त्यांची ही कविता वाचून कोणाचे ही मन भरून येईल. अशी कविता लिहत त्यांनी त्यांच्या भावना सगळ्यांसमोर मांडल्या आहेत. त्यांची ही कविता वाचून त्यांचे चाहते भावूक झाले असून त्यांनी ही डॉ. ओक यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.

तर डॉ. गिरीष ओक यांचा जन्म नागपूरला झाला. त्यांनी आयुर्वेद, मेडिसीन आणि सर्जरी या विषयात पदवी मिळवली आहे. डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले, तरी महाविद्यालयीन जीवनापासून ते एकांकिका, नाटकं यांच्यात काम करत आले आहेत. १९८४ मध्ये त्यांच्या या नाटकाच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. गेल्याच वर्षी ते साठ वर्षांचे झाले आहेत. तरी सुद्धा ते अजूनही ठणठणीत आहेत. त्यांनी अनेक मालिकां आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.