News Flash

ओळखलंत का महादेव अग्निहोत्रींना?

१० वर्षांचा काळ उलटला तरी आजही अग्निहोत्रच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत.

अभिनेते शरद पोंक्षे

तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र २’ ही लोकप्रिय मालिका नव्या कथानकासह स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होतेय. अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वात तीन पिढ्यांना जोडणारं सूत्र प्रेक्षकांना अनुभवता आलं. ‘अग्निहोत्र २’मध्ये नेमकी कोणती गोष्ट उलगडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच या मालिकेचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये महादेव अग्निहोत्रींची भूमिका पाहायला मिळतेय. ही भूमिका अभिनेते शरद पोंक्षे साकारत आहेत. २५ नोव्हेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अश्या गोष्टी जुळून आल्यामुळे ‘अग्निहोत्र’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. शरद पोंक्षेंसोबतच ‘अग्निहोत्र २’मध्ये कोणते कलाकार असतील याचीही उत्सुकता वाढलीय.

‘अग्निहोत्र २’ विषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ”१० वर्षांचा काळ उलटला तरी आजही अग्निहोत्रच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. एखाद्या मालिकेचा इतका प्रभाव असणं हे भारावून टाकणारं आहे. प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार करण्यात आला आहे. जुन्या मालिकेचा आशय आणि मांडणी हे प्रत्येकानेच पाहिले असल्याने तो दर्जा टिकवणं हे आमच्यासाठीही आव्हान आहे. परंतु अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शनाची जोड देऊन एक चांगली कलाकृती मराठी रसिकांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न असेल.”

‘अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 5:50 pm

Web Title: agnihotra popular marathi serial coming soon in a new way ssv 92
Next Stories
1 ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केली आत्महत्या
2 संसाराविषयी शाहिदने प्रियांकाला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
3 ‘हाऊसफुल ४’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये
Just Now!
X