News Flash

‘अहिल्या’ घडवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलीस अधिकारी हा प्रवास

अभिनेत्री प्रीतम कागणे मुख्य भूमिकेत

‘प्रत्येक व्यक्तीकडे सांगण्यासारखी एक अनोखी गोष्ट असते आणि जर तुम्हाला जगात काही बदल करायचे असल्यास सर्वात पहिले तुम्ही तुमची गोष्ट बदलायला हवी’, असा एक महत्त्वपूर्ण संदेश ‘अहिल्या’ या चित्रपटाच्या निमित्ताने अधोरेखित केला जाणार आहे. ‘रेड बल्ब स्टुडिओज’ प्रस्तुत ‘अहिल्या’ या चित्रपटात ‘अहिल्या पाटील’चा एक कॉन्सटेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

श्रीधर चारी निर्मित आणि राजू पार्सेकर दिग्दर्शित-लिखित या चित्रपटात कर्तबगार आणि डॅशिंग महिला पोलीस ‘अहिल्या पाटील’ हे पात्रं अभिनेत्री प्रीतम कागणे हिने साकारले आहे. प्रीतमसह या चित्रपटात प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, निशा परुळेकर आणि नूतन जयंत यांच्याही भूमिका आहेत.

मेहनतीने आणि आत्मविश्वासाने आयपीएस पोलीस अधिकारी झालेल्या महत्त्वांकाक्षी ‘अहिल्या’ची अभिमानास्पद गोष्ट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायाला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2019 7:52 pm

Web Title: ahilya upcoming marathi movie starring pritam kagne
Next Stories
1 ‘श्री कामदेव प्रसन्न’ मराठी वेब सीरिजमध्ये भाऊ कदम, सागर कारंडे
2 अडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन
3 गर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना
Just Now!
X