अक्षय कुमार आणि निमरत कौर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटाने दोन दिवसात ४४ कोटींची कमाई केली.

चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्या पासून तीन दिवसात याने ४४ कोटींचा गल्ला जमवला आहे. सुपरस्टार अक्षय कुमारच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १२.३५ कोटींची गल्ला केला. दुस-या दिवशीसुद्धा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड राखत १४.६० कोटींची कमाई केली. तर तिस-या दिवशी या चित्रपटाने १७.३५ ची सर्वाधिक कमाई केली. व्यापार विश्लेषक तरण आदर्श चित्रपटाच्या कमाईबद्दल ट्विट केले आहे.

इराक-कुवेत युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमधल्या १ लाख ७० हजार भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या रणजित कटियारची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. ही व्यक्तिरेखा बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने चित्रपटात साकारलीय.