News Flash

PHOTO : आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबद्ध

बँकॉकमध्ये पार पडला लग्नसोहळा

हॉटेलियर इमरून सेठीसोबत अमृता पुरी विवाहबद्ध झाली

सोनम कपूरच्या ‘आयशा’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अमृता पुरी हॉटेलियर इमरून सेठीसोबत विवाहबंधनात अडकली आहे. बँकॉकमध्ये शनिवारी हा लग्नसोहळा पार पडला. अमृताच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘पी.ओ.डब्ल्यू – बंदी युद्ध के’ मालिकेत अमृता शेवटची झळकलेली. या मालिकेतील तिचे सहकलाकार संध्या मृदुल, सत्यदीप शर्मा, ईशा चोप्रा या सोहळ्याला उपस्थित होते. या आणि इतरही काही कलाकारांनी तिच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमृता मोतिया रंगाच्या डिझायनर लेहंग्यामध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. तर इमरूननेही त्याच रंगाचा सूट परिधान केला होता. काही दिवसांपूर्वीच कुटुंबिय आणि जवळच्या मित्रमंडळींसह अमृता बँकॉकला रवाना झाली होती.

वाचा : ‘सैराट’ फेम आकाश ठोसरला बॉलिवूडची लॉटरी

सोनम कपूरच्या चित्रपटातून अमृताने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या ‘काय पो छे’मध्ये तिने त्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. ‘पी.ओ.डब्ल्यू – बंदी युद्ध के’ या मालिकेत तिने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षकांकडून बरीच प्रशंसा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 8:41 pm

Web Title: aisha actress amrita puri wedding pictures
Next Stories
1 ‘सैराट’ फेम आकाश ठोसरला बॉलिवूडची लॉटरी
2 Padmavati controversy : राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
3 PoK संदर्भात फारुख अब्दुल्लांच्या वक्तव्याचे ऋषी कपूर यांच्याकडून समर्थन
Just Now!
X