News Flash

PHOTO : ..अन् सेल्फीसाठी ऐश्वर्या-विवेक आले एकत्र!

जवळपास एका दशकानंतर हे दोघं एकत्र दिसले.

PHOTO : ..अन् सेल्फीसाठी ऐश्वर्या-विवेक आले एकत्र!
ऐश्वर्या राय बच्चन, विवेक ओबेरॉय

बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन ही तिच्या सुखी संसारात रमली आहे. अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतरही ऐश्वर्याने कधीच चित्रपटसृष्टीपासून नाते तोडले नाही. महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ती आपल्या कुटुंबासोबत नेहमीच उपस्थित राहते. सध्या आराध्याच्या संगोपनात रमलेली ही अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. मात्र, ऐश्वर्याचा भूतकाळ अजूनही तिचा पाठलाग सोडत नसल्याचे दिसते. कारण, नुकतात तिचा आणि विवेक ओबेरॉयचा एक ग्रुप सेल्फी समोर आला असून, त्याचीच चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.

वाचा : ‘बिग बॉस ११’तून सलमानने कमावले *** कोटी रुपये

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या ‘बॉलिवूड सेल्फी’च्या निमित्ताने ऐश्वर्या आणि विवेक एकाच फ्रेममध्ये पाहावयास मिळले. ‘शॅलोम बॉलिवूड’ कार्यक्रमात जवळपास एका दशकाच्या अंतरानंतर हे दोघं एकत्र दिसले. या सेल्फीत नेतान्याहू यांच्यासह ऐश्वर्या आणि विवेक आनंदाने पोज देताना दिसत आहेत. स्वतः नेतान्याहू यांनी शेअर केलेल्या या सेल्फीत अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, करण जोहर, प्रसून जोशी, इम्तियाज अली यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. ‘माझा हा बॉलिवूड सेल्फी ऑस्करमधील एलेन डिजीनेरेसच्या हॉलिवूड सेल्फीवर मात करू शकेल का?’ असे कॅप्शन त्यांनी फोटोला दिले आहे.

वाचा : प्रियांकाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचे सत्य

भारतीय चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांना इस्रायलमध्ये व्यवसायाच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान बेंजामिन यांच्यासह त्यांच्या पत्नी सारा नेतान्याहू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 11:44 am

Web Title: aishwarya rai bachchan and vivek oberoi share same frame at shalom bollywood
Next Stories
1 बिग बींच्या फॉलोअर्सचा आकडा पाहून इस्रायलचे पंतप्रधानही झाले अचंबित
2 ‘बिग बॉस ११’तून सलमानने कमावले *** कोटी रुपये
3 प्रियांकाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचे सत्य
Just Now!
X