24 October 2020

News Flash

‘सरबजीत’मधील गाण्यासाठी ऐश्वर्याचा पारंपरिक पंजाबी लूक

ऐश्वर्या राय-बच्चन सरबजीतच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.

Aishwarya Rai Bachchan : यापूर्वी 'सरबजीत'च्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्या विनामेकअप दिसली होती. मात्र, या सगळ्याची कसर तिच्या नव्या लूकमध्ये भरून काढण्यात आली आहे.

बॉलीवूडच्या ‘सरबजीत’ या आगामी चित्रपटातील ऐश्वर्या रायची काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली असून यामध्ये ऐश्वर्या पारंपरिक पंजाबी पेहरावात दिसते. चित्रपटातील एका खास लोकगीतासाठी ऐश्वर्याला खास लूक देण्यात आला आहे. यामध्ये लाल रंगाचा सलवार-कमीज, बिंदी, हातात बांगड्या घातलेली ऐश्वर्या पारंपरिक पंजाबी गृहिणीसारखीच दिसत आहे. यापूर्वी ‘सरबजीत’च्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्या विनामेकअप दिसली होती. मात्र, या सगळ्याची कसर तिच्या नव्या लूकमध्ये भरून काढण्यात आली आहे.
चित्रपटात अभिनेता रणबीर हुडा ‘सरबजीत’ची भूमिका साकारत आहे. येत्या १९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपट ऐश्वर्या राय-बच्चन सरबजीतच्या बहिणीची (दलबीर कौर)ची भूमिका साकारत असून रिचा चढ्ढा व दर्शन कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सरबजीत सिंह याने चुकीने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्याला पाकिस्तानच्या कारागृहात डांबले. तेथे त्याचा छळ करण्यात आला. त्याच्या सुटकेसाठी कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले, पण यशस्वी झाले नाहीत. कारागृहातच त्याचा मृत्यू ओढवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 2:12 pm

Web Title: aishwarya rai bachchan dresses up in traditional red suit for sarbjit punjabi song
Next Stories
1 जॅकलीनचा ‘ढिशूम’मधील फर्स्टलूक!
2 ‘कंगना चांगली अभिनेत्री पण, राष्ट्रीय पुरस्कार दीपिका किंवा प्रियांकाला मिळायला हवा होता’
3 कपिल शर्माच्या नव्या कार्यक्रमाच्या प्रोमोची शाहरूखसोबतची छायाचित्रे व्हायरल
Just Now!
X