News Flash

अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्याने घातलेल्या गाउनची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

नुकतीच ती पती अभिषेक बच्चन याच्यासह अंबानींच्या पार्टीला गेली होती.

अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्याने घातलेल्या गाउनची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
ऐश्वर्या राय बच्चन

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्यासह फॅशन स्टेटमेंटसाठीही नावाजली जाती. कान चित्रपट महोत्सवात घातलेल्या प्रिन्सेस गाउनपासून ते एखाद्या लग्नात तिने घातलेल्या पंजाबी ड्रेसपर्यंत सगळ्याचीच चर्चा केली जाते. ऐश्वर्याच्या या महागड्या स्टाइल स्टेटमेंटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच ती पती अभिषेक बच्चन याच्यासह अंबानींच्या पार्टीला गेली होती. या संपूर्ण पार्टीत सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.

सिने’नॉलेज’ : नाना पाटेकर यांनी कोणत्या मालिकेत नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती?

ऐश्वर्याची स्टायलिस्ट आस्था शर्माने तिचे काही फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्याने सोनेरी रंगाचा गाउन घातला होता. बॉलरुम गाउन आणि कोटचे योग्य मिश्रण असलेल्या या गाउनमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. ऐश्वर्याने घातलेला गाउन ‘अॅलेक्सिस मॅबिल फॉल विंटर २०१७-१८’ कलेक्शनमधील असून, त्याची किंमत कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ऐश्वर्याने घातलेल्या बॉलरुम गाउनची किंमत ४९२५ युरो म्हणजेच ३.७ लाख रुपये इतकी आहे.

TOP 10 NEWS : लवकरच विवाहबंधनात अडकणाऱ्या मराठी अभिनेत्यापासून बाहुबलीपर्यंत

सध्या ही सौंदर्यवती ‘फन्ने खान’ या आगामी चित्रपटासाठी चित्रीकरण करत आहे. यात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही मुख्य भूमिका आहेत. ‘ताल’नंतर ऐश्वर्या – अनिल कपूरची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ पाडण्यासाठी आता सज्ज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 10:14 am

Web Title: aishwarya rai bachchan looks drop dead gorgeous in an alexis mabille gown
Next Stories
1 सिने’नॉलेज’ : नाना पाटेकर यांनी कोणत्या मालिकेत नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती?
2 झायरा वसीमशी गैरवर्तणूक करणाऱ्याला अटक
3 TOP 10 NEWS : लवकरच विवाहबंधनात अडकणाऱ्या मराठी अभिनेत्यापासून बाहुबलीपर्यंत
Just Now!
X