News Flash

ऐश्वर्या.. अशीही

बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावरून काही काळासाठी तात्पुरती सुट्टी घेतलेल्या ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या पुनरागमनाची चर्चा सुरू आहे.

| March 7, 2015 07:10 am

बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावरून काही काळासाठी तात्पुरती सुट्टी घेतलेल्या ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या पुनरागमनाची चर्चा सुरू आहे. तीचे ‘कमबॅक’ जेव्हा कधी होईल तेव्हा होईल. पण फॅशनच्या दुनियेतील एका मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकून ऐश्वर्याने एका वेगळ्या स्वरूपात पुनरागमन केले आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या लग्नानंतर काही काळ ऐश्वर्या चित्रपटातून काम करत होती. मात्र बाळंतपणानंतर मुलीच्या संगोपनासाठी ऐश्वर्याने काही महिन्यांसाठी बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यापासून दूर राहणे पसंत केले आहे. तिच्या ‘कमबॅक’ची चर्चा अधूनमधून सुरू असते. संजय गुप्ताच्या ‘जजबा’ या चित्रपटाद्वारे तिचे पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन होणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये असली तरी हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीच माहिती नाही.
ऐश्वर्याच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडलाही तिच्या पुनरागमनाची उत्सुकता आहे. ही उत्सुकता कायम ठेवत भारतातील फॅशनविषयाला वाहिलेल्या ‘व्होग’ या मासिकाच्या मार्च महिन्याच्या मुखपृष्ठावर ऐश्वर्याने आपली छबी झळकविली आहे. यातून तिने ‘ग्लॅमर’च्या क्षेत्रात पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. या मासिकाच्या मुखपृष्ठावर ऐश्वर्याचे ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ रूप पाहायला मिळते.
ऐश्वर्याच्या या छायाचित्रासोबतच मासिकाच्या मुखपृष्ठावर तिचे एक ‘कोट’ देण्यात आले आहे. ‘ऐश्वर्या, कमबॅक? आय नेव्हर वेंट अवे’.. बॉलिवूड आणि रुपेरी पडद्यापासून मी दूर गेलेली नाही. मी लवकरच परत येतेय, तोपर्यंत जरा थांबा, माझे हे नवे रूप पाहा, मी पुन्हा येत आहे, असेच जणू काही ऐश्वर्याला तिच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडला सुचवायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2015 7:10 am

Web Title: aishwarya rai bachchan looks stunning on the march cover of vogue india
टॅग : Bollywood
Next Stories
1 बॉलीवूड सेलेब्रिटींची ट्विटरमय होळी
2 एआयबी नॉकआउट शो : दीपिकाला न्यायालयाचा दिलासा
3 व्हॉट अबाऊट सावरकर?’च्या टीमची अनोखी होळी
Just Now!
X