दमदार अभिनय व मनमोहक सौंदर्य या दोन गोष्टींमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘गुरू’, ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक जुन्हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रदर्शित होऊ न शकलेल्या एका चित्रपटातील आहे.

चित्रपटातील एका गाण्याची शूटिंग सुरू होती. तेव्हाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील ऐश्वर्याच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जांभळ्या रंगाचा लेहंगा, मेकअप, दागदागिने असा साजश्रृंगार करून ती गाण्याच्या शूटिंगसाठी तयार झाली आहे. तिच्या आरसपानी सौंदर्यावर नेटकरी घायाळ झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

I can’t take my eyes off her.

हा व्हिडीओ ‘राधेश्याम सिताराम’ या चित्रपटातील असून १९९७ मध्ये तो प्रदर्शित होणार होता. अनीस बाझमी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. चित्रपटात ऐश्वर्यासोबत सुनील शेट्टीची मुख्य भूमिका होती. यामध्ये ऐश्वर्या व सुनील शेट्टीच्या दुहेरी भूमिका होत्या. मात्र काही कारणास्तव तो चित्रपट पडद्यावर झळकू शकला नव्हता.