ऐश्वर्या राय बच्चनची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली आहे. तिची स्टाईल तिच्या अदा यांची कायम चर्चा होते. रेड कार्पेटवरचा तिचा लुक असो किंवा अगदी साडीतली ती असो तिच्या स्टाईलची तिच्या लुकची चर्चा होतेच. याच ऐश्वर्या राय बच्चनचा एक फोटो फेमिना या मॅगझीनच्या मुखपृष्ठावर झळकला आहे. या फोटोत ऐश्वर्याचा लुक ग्लॅमरस आहे. फॅशन मॅगझिन फेमिनाने २०१८ तील सुंदर महिलांची यादी जाहीर केली आहे. त्याचमुळे या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर ऐश्वर्याचा फोटो आहे.
फेमिना च्या कव्हरपेजवर असलेल्या फोटोत मेटालिक सिल्व्हर रंगाचा कोट ऐश्वर्याने घातला आहे. या कोटाला चायनिज कॉलर आहे. तसेच या कोटाची बटणेही स्टायलिश आहेत. टेक्सचर्ड ब्लॅक पँट आणि त्यावर सिल्व्हर रंगाचा कोट यातला ऐश्वर्याचा लुक लक्ष वेधून घेतो आहे. मोकळे सोडलेले केस आणि चेहेऱ्यावरचा मेक अप यामुळे हा फोटो अगदी परफेक्ट जमून आला आहे.
काही दिवसांपूर्वीच फन्ने खान या सिनेमातील ऐश्वर्या राय बच्चनचा लुक समोर आला होता. या लुकचीही बरीच चर्चा झाली होती. फन्ने खान सिनेमात ऐश्वर्या सोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही भूमिका आहेत. ऐश्वर्या राय आणि अनिल कपूर १५ वर्षांनी सिनेमात एकत्र काम करत आहेत. या सिनेमातल्या लुक पाठोपाठ आता फेमिनाच्या कव्हर पेजवर झळकलेल्या ऐश्वर्याच्या फोटोचीही चर्चा रंगते आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 5:43 am