News Flash

Video : जया बच्चन यांच्या ‘त्या’ शब्दांमुळे ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी

पुरस्कार सोहळ्यात घडला हा प्रसंग

बॉलिवूडचं ऐश्वर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या रायने २००७ साली अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ऐश्वर्या राय-बच्चन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं बच्चन कुटुंबासोबत एक घट्ट नातं निर्माण झालं आहे. केवळ इतकंच नाही तर ती सासू-सासऱ्यांची लाडकी सूनदेखील झाली आहे. मात्र एका पुरस्कार सोहळ्यामध्ये सासू जया बच्चन यांचं भाषण ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी तरळलं.

ऐश्वर्या लोकप्रिय अभिनेत्री असून ती तिच्या कुटुंबातील जबाबदाऱ्याही नीट पार पाडते. याचा प्रत्ययदेखील अनेकांना पाहायला मिळाला आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून जया बच्चन यांनी ऐश्वर्याबद्दल काढलेल्या उद्दगारांमुळे ऐश्वर्याला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

सोशल मीडियावर गाजत असलेला व्हिडीओ फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यातील असून जया बच्चन यांनी मंचावर ऐश्वर्याचं प्रचंड कौतुक केलं. ती केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर आदर्श सूनदेखील आहे, असं त्या म्हणाल्या. यासोबतच तिच्याविषयी त्यांना आवडलेल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ज्या ऐकून ऐश्वर्याला रडू आलं.

आज मी अशा एका गोड मुलीची सासू होत आहे ज्याकडे सगळे संस्कार आहेत. तिच्याकडे गोड हास्य आहे. आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे. लव्ह यू”, असं जया बच्चन “या पुरस्कार सोहळ्यात म्हणाल्या. विशेष म्हणजे त्यांचे हे शब्द ऐकल्यानंतर त्यांची लेक श्वेता बच्चन नंदा हिलादेखील रडू आलं. दरम्यान,ऐश्वर्या राय हिचं अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत खास नातं आहे. विशेष म्हणजे बिग बी, ऐश्वर्याला सून म्हणून नाही तर मुलगी मानतात हे अनेक वेळा पाहायला मिळालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 11:14 am

Web Title: aishwarya rai cried after emotional speech of jaya bachchan in an award show ssj 93
Next Stories
1 ‘गेल्या २२ वर्षापासून मी लॉकडाउनमध्ये’; अजयने देवगणचं मजेदार ट्विट
2 बोल्ड फोटो पोस्ट करत रसिकाने नेटकऱ्यांना दिली सक्त ताकिद
3 माधुरीच्या बहिणीला कधी पाहिलं आहे का? मग ‘हा फोटो नक्कीच पाहा
Just Now!
X