31 October 2020

News Flash

Video : ऐश्वर्या रायचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

तिचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर जुन्या व्हिडीओंचा ट्रेंड पाहायला मिळतो. अनेक कलाकारांचे जुने व्हिडीओ पुन्हा चर्चेत आहेत. अशातच बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या डान्स करताना दिसत आहे.

ऐश्वर्या राय या फॅनपेजने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या डान्स करताना दिसत आहे. तिचा हा जुना व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ ८८ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून अनेकांनी लाईक केला आहे. सध्या ऐश्वर्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यासोबतच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्च आणि आराध्याची देखील करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. आता संपूर्ण बच्चन कुटुंबीयांनी करोनावर मात केली आहे.

ऐश्वर्याने ‘फन्ने खान’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात राजकुमार राव आणि अनिल कपूर हे देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता लवकरच ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ती अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामुन’ या चित्रपटातही भूमिका साकारु शकते अशा चर्चा रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 1:31 pm

Web Title: aishwarya rai dance video viral avb 95
Next Stories
1 “मला ग्लॅमरस म्हणू नका मी टॉमबॉय आहे”; ‘मोस्ट डिजायरेबल वुमन’ची चाहत्यांना विनंती
2 ‘बिग बॉस १४’साठी सलमान घेणार इतके मानधन?
3 ‘रिया एक मोहरा आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार….’, बॉलिवूड दिग्दर्शकाचे खळबळजनक ट्विट
Just Now!
X