21 February 2019

News Flash

Fanne Khan: ‘फन्ने खान’मधील ऐश्वर्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित

चित्रपटात ऐश्वर्याची म्युजिकल दिवाची भूमिका

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चनच्या आगामी ‘फन्ने खान’ या चित्रपटातील तिचा लूक नुकताच प्रदर्शित झाला. ‘क्रिअर्ज एंटरटेन्मेंट’ने ट्विटरवर तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या, अनिल कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ऑस्करसाठी निवड झालेल्या ‘एव्हरीबडीज फेमस’ (२०००) या चित्रपटाच्या कथेवर ‘फन्ने खान’ची कथा आधारित आहे.

काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर मिलिटरी जॅकेटमधील ऐश्वर्याचा हा लूक काहीसा ‘ऐ दिल है मुश्कील’मधील लूकसारखा वाटतो. ‘एव्हरीबडीज फेमस’ची कथा एका पित्याची आहे, जो आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार असतो. गायनक्षेत्रात आपल्या मुलीचं नाव होण्यासाठी तो देशातल्या प्रसिद्ध गायकाचंही अपहरण करतो. राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित हा चित्रपट एक म्युझिकल ड्रामा असल्याचंही म्हटलं जात आहे.

वाचा : प्रिया वरियरची या वादग्रस्त दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा

ऐश्वर्याची भूमिका संगीताशी निगडीत असून ती या चित्रपटात तिच्याहून १० वर्षे लहान राजकुमारसोबत दिसणार आहे. १५ जून रोजी फन्ने खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सलमान खानच्या ‘रेस ३’सोबत त्याची टक्कर होणार आहे.

आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने महत्त्वपूर्ण भूमिका करण्याकडे प्राधान्य दिले होते. तिने ‘जझ्बा’, ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’सारख्या सिनेमांत अभिनयाची चुणूक पुन्हा दाखवून दिली. ‘जझ्बा’ आणि ‘सरबजीत’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करण्यात अयशस्वी ठरले तरी यातील ऐश्वर्याच्या कामाची आणि तिने स्वीकारलेल्या भूमिकांची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात आली होती.

 

First Published on February 13, 2018 7:59 pm

Web Title: aishwarya rai look revealed from fanne khan