News Flash

कॅमेराला हिंदीत काय म्हणतात? शाहरुखच्या प्रश्नावर ऐश्वर्याची गुगली

कॅमेराला हिंदीत काय म्हणतात? ऐश्वर्या म्हणते...

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. केवळ सौंदर्य किंवा अभिनयशैलीच नव्हे तर ऐश्वर्या तिच्या हजरजबाबीपणामुळेदेखील ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता शाहरुख खान ऐश्वर्याला काही इंग्रजी शब्द सांगू त्याचा हिंदी अर्थ विचारत आहे. विशेष म्हणजे शाहरुखच्या प्रश्नावर ऐश्वर्याने दिलेलं उत्तर पाहून उपस्थित सारेच जण थक्क झाल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला असून तो एका पुरस्कार सोहळ्यातला असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान ऐश्वर्याला काही इंग्रजी शब्दांचे हिंदी अर्थ विचारताना दिसत आहे. विशेष म्हणजे शाहरुखने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ऐश्वर्याने बरोबर दिल्याचं दिसून आलं.

ऐश्वर्याने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर कॅमेराला हिंदी काय म्हणतात ?,असा प्रश्न शाहरुखने विचारला. कदाचित ऐश्वर्याला या प्रश्नाचं उत्तर येणार नाही असा समज शाहरुखचा झाला होता. मात्र, त्यावर ऐश्वर्याने पटकन कॅमेराला ‘प्रतिबिंब पेटी’ म्हणतात असं उत्तर दिलं. ऐश्वर्याचं हे उत्तर ऐकल्यानंतर उपस्थित सारेच थक्क झाले.

दरम्यान, शाहरुखने ऐश्वर्यासोबत काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये ऐश्वर्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हेदेखील शाहरुखने यावेळी सांगितल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 1:25 pm

Web Title: aishwarya rai tells camera hindi meaning on shah rukh khan question video goes viral on internet ssj 93
Next Stories
1 ‘अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलतायेत?’; महेश टिळेकर यांचा सवाल
2 “…तर आज ही वेळ आली नसती”; अलका कुबल यांच्या आरोपांवर बोलताना प्राजक्ताला अश्रू अनावर
3 ‘तारक मेहता…’मधील बबिताचा बिकिनी लूक पाहून चाहते घायाळ
Just Now!
X