माजी विश्व सुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आज (१ नोव्हेंबर) ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. या विश्वसुंदरीच्या चाहत्यांनी तिला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे. मात्र, ऐश्वर्या सोशल मिडियाचा अधिक वापर करत नसल्यामुळे पती अभिषेक बच्चने सर्व चाहत्यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत. तसेच, अभिषेक ऐश्वर्याला दिवसाअखेर ट्विटरवरून चाहत्यांचे आभार मानणारे ट्विट करण्यास सांगणार आहे, असे त्याने ट्विट केले आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे नीता अंबानी यांच्या वाढदिवसाकरिता जोधपूरला गेले आहेत. त्यामुळे ऐश्वर्या तिचा वाढदिवस पती अभिषेक आणि चिमुकल्या आराध्यासोबत सेलिब्रेट करणार आहे. येत्या १६ नोव्हेंबर आराध्या दोन वर्षांची होणार आहे.