करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे मनोरंजनक्षेत्र पूर्णपणे ठप्प पडले आहे. चित्रीकरण थांबल्यामुळे टीव्ही मालिकांना लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याचा फटका आता हळूहळू छोट्या पडद्यावरील कलाकारांना देखील बसू लागला आहे. स्वत:च्या कामाचे पैसे मागायला देखील लाज वाटत असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री एश्वर्या सखुजा हिने दिली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – या चित्रपट दिग्दर्शकाने केली आत्महत्या

‘सास बिना ससुराल’ या मालिकेमधून नावारुपास आलेली एश्वर्या छोट्या पडद्यावरील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या बिकट परिस्थितीवर भाष्य केले. ती म्हणाली,

सर्वाधिक वाचकपसंती – PM Care फंडातील निधीचं काय केलं?; अभिनेत्रीचा मोदी सरकारला सवाल

“टीव्ही कलाकार देखील रोजंदारीवर काम करतात. काही ठराविक कलाकार सोडले तर इतर सर्व लहान मोठ्या कलाकारांना एपिसोडनुसार पैसे दिले जातात. लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण सध्या बंद आहे. परिणामी निर्मात्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या कामाचे पैसे मागायला देखील लाज वाटत आहे. सर्वच कलाकार सध्या आर्थिक संकटाशी लढत आहेत.”

एश्वर्याने २००३साली ‘जीत’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘रिश्ता डॉट कॉम’, ‘यु आर माय जान’, ‘मै ना भूल पाऊंगी’, ‘त्रिदेवीया’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच ‘उजडा चमन’ या चित्रपटामध्येही तिने काम केले आहे.