News Flash

‘दख्खनजा राजा ज्योतिबा’ मालिकेत यमाईच्या भूमिकेत ऐताशा संझगिरी

पौराणिक मालिकेत भूमिका साकारण्याची पहिलीच वेळ

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. दख्खनच्या राजाचं विशाल रुप प्रेक्षकांच्या भेटीला आलंच आहे. त्याचबरोबर मोठ्या यमाई आणि चोपडाईचं दर्शन देखील प्रेक्षकांना होत आहे. अभिनेत्री ऐताशा संझगिरी या मालिकेत यमाईच्या रुपात दिसत असून पौराणिक मालिकेत भूमिका साकारण्याची ऐताशाची पहिलीच वेळ आहे.

ऐताशाने याआधी स्टार प्रवाहच्याच छोटी मालकीण या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. यमाई साकारण्याच्या अनुभवाविषयी ऐताशा म्हणाली, “माझ्यासाठी हा खरंच खूप वेगळा अनुभव आहे. यमाई म्हणजे रेणुका देवीचा अवतार. धाडसी आणि प्रचंड आत्मविश्वासू अशी भूमिका मला यमाईच्या निमित्ताने साकारायला मिळत आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीत आमच्या मालिकेचं शूटिंग सुरु आहे. खरंतर आमचे आऊट डोअर सीन खूप असल्यामुळे सेटचा वापर खूप कमी होतो. त्यामुळे कोल्हापूरच्या निसर्गरम्य वातावरणात शूट करण्याचा आनंद काही औरच आहे. माझा लूकसुद्धा वेगळा आहे. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि डोक्यावरची चिरी अश्या पद्धतीने मी यमाईच्या व्यक्तिरेखेसाठी सज्ज होते. माझ्यासाठी यमाई साकारणं हा समृद्ध करणारा अनुभव आहे.”

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या निमित्ताने रसिकांपर्यंत प्रामाणिक मनोरंजनाद्वारे त्यांच्या आराध्य दैवताचं दर्शन आणि त्या दैवताच्या आयुष्यातील माहित असलेले आणि काही नव्याने कळतील असे पैलू या मालिकेद्वारे मांडण्यात येत आहेत. ही मालिका दररोज सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 1:24 pm

Web Title: aitasha sanjhgiri to play yamai in dakkhancha raja jyotiba marathi serial ssv 92
Next Stories
1 बोमन इराणी यांच्या बहिणीच्या घरी कोट्यवधींची चोरी
2 गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट्स देण्यासाठी बॉलिवूड लेखकाची अजब युक्ती; पोलिसांनी केली अटक
3 ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत नवं वळण
Just Now!
X