प्रदर्शनाची तारीख जवळ आली असताना नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ या चित्रपटाला अद्याप सेन्सॉर बोर्डाने प्रमाणित केले नाही. संरक्षण मंत्रालयाने या चित्रपटावर हरकत घेतल्याने त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय सेन्सॉर बोर्ड प्रमाणपत्र देणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा दोन लष्करी अधिकाऱ्यांची आहे. ज्यांच्या काम करण्याच्या पद्धती पूर्ण वेगळ्या असतात. लष्करातील भ्रष्टाचारावरही यातून भाष्य केले असल्याने संरक्षण मंत्रालयाने चित्रपटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह काही नाही ना, याची खातरजमा करून घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी चित्रपट दाखवण्याचीही मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे.

वाचा : रणवीरच्या अतरंगी फॅशन सेन्सविषयी कतरिना म्हणते..

सुरुवातीला पद्मावत आणि पॅडमॅन या चित्रपटांशी स्पर्धा असल्याने अय्यारीच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. तरीसुद्धा ९ फेब्रुवारीला अक्षय कुमारच्या पॅडमॅनसोबत या चित्रपटाचा मुकाबला होणार आहे. शिवाय आता ही नवीन समस्या निर्माण झाल्याने निर्माते धास्तावले आहेत.

वाचा : या ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे अदितीला मिळाली खिल्जीच्या पत्नीची भूमिका

अय्यारीमध्ये सिद्धार्थ आणि मनोज गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत. तर अनुपम खेर, नसिरुद्दीन शाह, रकुल प्रीत, विक्रम गोखले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.