News Flash

Aiyaary Trailer: सिद्धार्थ- मनोजची दमदार ‘अय्यारी’

गुरू आणि शिष्य यांच्या खऱ्या आयुष्याची कथा आहे

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी स्टारर ‘अय्यारी’ सिनेमा पुढच्यावर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नीरज पांडे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. त्याने याआधी ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘स्पेशल २६’, ‘बेबी’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अय्यारीचा सामना अक्षय कुमारच्या पॅडमॅन सिनेमाशी होणार आहे. ‘पॅडमॅन’ सिनेमाही २६ जानेवारीलाच प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी, अनुपम खेर आणि नसीरुद्दीन शाह फार गंभीर लूकमध्ये दिसत आहेत. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहही या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची कथा दोन लष्करी अधिकाऱ्यांची आहे. ज्यांच्या काम करण्याच्या पद्धती पूर्ण वेगळ्या असतात. ही एका गुरू आणि शिष्य यांच्या खऱ्या आयुष्याची कथा आहे.

रकुल प्रीत आणि सिद्धार्थ यांनी या सिनेमाचे बहुतांश काम पूर्ण केले आहे. रकुलने सांगितले की, तिला नीरज पांडेचे प्रत्येक सिनेमे आवडले. पण ‘एमएस धोनी…’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही. सुरूवातीला तिला एमएस धोनीची पहिल्या प्रेयसीची भूमिका देण्यात आली होती. रकुलने सिनेमाची संहिता वाचताच क्षणी सिनेमाला होकारही दिला होता. पण तिच्या दाक्षिणात्य सिनेमांना दिलेल्या तारखांमुळे ती या सिनेमात काम करु शकली नाही. ‘अय्यारी’ सिनेमात तिने अनुपम खेर, नसीरुद्दीन शहा, मनोज वाजपेयी यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 7:06 pm

Web Title: aiyaary trailer protege sidharth malhotra gives mentor manoj bajpayee a run for his money
Next Stories
1 मराठी चित्रपटांना प्राइम टाइम द्या- शालिनी ठाकरे
2 ही आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीची मलायका अरोरा
3 चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाटक का करु, रिचाचा सवाल
Just Now!
X