News Flash

अजय देवगणच्या गाडीची अडवणूक, एकाला अटक

अभिनेता अजय देवगण यांचे वाहन अडविल्याप्रकरणी  राजदीप सिंग (२८) विरोधात गुन्हा दाखल करून दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.

अजय देवगण

शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याची मागणी

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता अजय देवगण यांचे वाहन अडविल्याप्रकरणी  राजदीप सिंग (२८) विरोधात गुन्हा दाखल करून दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला  समर्थन का देत नाही, असा जाब विचारत सिंगने देवगण यांची गाडी अडविली होती.

अभिनेता अजय देवगण हे मंगळवारी सकाळी फिल्म सिटी येथे निघाले होते. मालाड पूर्वेला संतोषनगर परिसरात वाहतूक कोंडी असल्याने त्यांच्या वाहनाचा वेग कमी झाला होता. यावेळी सिंग हा रिक्षाने निघाला होता. देवगण यांना पाहताच तो रिक्षातून खाली उतरला आणि त्यांच्या गाडीला समोर गेला. ‘तुम्ही गाडीतून खाली उतरा, मला तुमच्याशी बोलायचे आहे,’ असे म्हणून त्याने गाडी अडविली. तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा का देत नाही, असा जाब विचारू लागला. यावेळी देवगण यांचे सुरक्षा रक्षक वाहनातून खाली उतरले. त्यानंतर सिंग आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वादावाद झाली. याप्रकरणी देवगण यांच्या सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 1:02 am

Web Title: ajay devgan car stopped by a person dd 70
Next Stories
1 ‘तांडव’ वेब मालिके बाबात ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’चा माफीनामा
2 मृण्मयी आणि गौतमीची सुरेल मेजवानी, ही वाट दूर जाते…
3 घरच्या ‘जिम्नॅस्ट’मुळं हैराण आहे ट्विंकल खन्ना; म्हणते हिच्यापेक्षा त्रास देणारे शेजारी बरे!
Just Now!
X