25 February 2021

News Flash

शाहरुखच्या ‘त्या’ ट्विटवर अजयने दिले उत्तर

अजयने ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगाची चित्रपट ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील अजय देवगणचा लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अजय देवगणच्या कारकिर्दीमधील सर्वात महत्त्वाचा आणि १०० वा चित्रपट आहे. अजयचा हा १०० वा चित्रपट असल्यामुळे बॉलिवूडमधील सर्व कलाकारांनी अजयवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दरम्यान बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने देखील अजला जुने वाद विसरुन ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत शाहरुखने छान असे कॅप्शन दिले होते. ‘माझा मित्र अजय देवगणच्या १००व्या आणि आगामी चित्रपटाची मला उत्सुकता आहे. या १०० व्या चित्रपटासाठी तुला शुभेच्छा… तु चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठा प्रवास केला आहेस. तान्हाजी चित्रपटासाठी तुला खूप खूप शुभेच्छा’ असे शाहरुखने ट्विटमध्ये लिहिले होते.

आता शाहरुखच्या या ट्विटला अजय देवगणने प्रत्युत्तर दिले आहे. ‘माझा १०० वा चित्रपट तान्हाजी आणखी खास बनवण्यासाठी तुझे आभार!’ असे अजयने ट्विटमध्ये लिहिले होते.

आणखी वाचा : ‘तानाजी’च्या निमित्ताने मिटला शाहरुख-अजयचा वाद?

‘स्वराज्य’निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचे कतृत्त्व सोनेरी अक्षरात कोरले आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तान्हाजी मालुसरे होय. तान्हाजींच्या पराक्रमाची कथा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. अद्यापही चित्रपटातील इतर व्यक्तीरेखांवरून पडदा उठणे बाकी आहे. मराठी अभिनेता अजिंक्य देव या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 6:11 pm

Web Title: ajay devgan gave reply to shahrukh khan tweet avb 95
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे अक्षय कुमार व रोहित शेट्टीत झाली हाणामारी, पाहा व्हिडीओ
2 कार्तिक-जान्हवीने प्रदूषणामुळे दिल्लीतील शूट केलं रद्द
3 चाहत्यांवर ‘शूटर दादी’ची छाप, लोकप्रियतेमध्ये पटकावलं पहिलं स्थान
Just Now!
X