News Flash

‘कोंढाण्या’ला बॉलीवूडचे ग्लॅमर

मुघलांकडून कोंढाणा परत मिळवण्याची ही थरारक कथा सांगणारा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तडफदार सुभेदार तानाजी साकारण्याची जबाबदारी

काजोल आणि अजय देवगणची ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रत्यक्ष आयुष्यातले हे जोडीदार चित्रपटातही तानाजी आणि सावित्री मालुसरेंच्या रूपात पती-पत्नी साकारणार आहेत.

जय पाटील – response.lokprabha@expressindia.com

आगामी

‘आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं’ म्हणत कोंढाण्यावर स्वारीसाठी निघालेले तानाजी मालुसरे, घोरपडीच्या शेपटीला बांधलेल्या दोरखंडाच्या साहाय्याने केलेली चढाई, उदयभानाशी झुंज देताना आलेली वीरगती, त्यानंतर ‘गड आला पण सिंह गेला’ असे शिवाजी महाराजांचे उद्गार आणि त्यावरून कोंढाण्याचं सिंहगड असं केलेलं नामकरण.. तानाजी मालुसरे म्हटलं की कोणालाही शालेय इतिहासाच्या पुस्तकातले हे संदर्भ हमखास आठवतात. मुघलांकडून कोंढाणा परत मिळवण्याची ही थरारक कथा सांगणारा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित होणार असून मराठय़ांच्या शौर्याचा, त्यागाचा हा इतिहास पडद्यावर उभा करण्यात दिग्दर्शक ओम राऊत यशस्वी होणार का याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

तडफदार सुभेदार तानाजी साकारण्याची जबाबदारी अजय देवगणच्या खांद्यावर आहे. अजयच्या या १००व्या चित्रपटासाठी शाहरूख खान, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, अर्शद वारसी यांनी नुकत्याच त्याला समाजमाध्यमांवरून शुभेच्छा दिल्या. अजयने ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन शतक साजरं करावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ओमकारामधली गाजलेली नायक-खलनायकाची जोडी पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. १३ वर्षांनी अजय देवगण आणि सैफ अली खान यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची संधी मिळणार आहे. काजोल आणि अजय देवगणची ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रत्यक्ष आयुष्यातले हे जोडीदार चित्रपटातही तानाजी आणि सावित्री मालुसरेंच्या रूपात पती-पत्नी साकारणार आहेत. अजय देवगणचा फेटा बांधलेला, कपाळी टिळा आणि हाती ढाल-तलवार असलेला लुक सध्या चर्चेत आहे. स्वराज्यासाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या विसरून शौर्य गाजवणाऱ्या; मृत्यूचीही तमा न बाळगणाऱ्या शूर सुभेदाराची भूमिका साकारण्याची जबाबदारी अजयवर आहे. सावित्री या पात्राला अनेक पैलू आहेत. साधी, प्रेमळ, घरगुती जबाबदाऱ्या चोख पार पाडतानाच तानाजींच्या अनुपस्थितीत किल्ल्याची जबाबदारीही समर्थपणे निभावून नेणारी शूर पत्नी अशी ही आव्हानात्मक भूमिका आहे. नऊवारी साडी, डोक्यावर पदर, नथ आणि कुंकू लावलेली काजोलची छायाचित्रे पाहता, तिचा लूक सावित्रीच्या भूमिकेत चपखल बसेल, अशी चर्चा आहे. लांब काळे केस, दाढी, डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि चेहऱ्यावर क्रुद्ध भाव असा सैफचा लुक आहे. साहसाचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंढाण्याच्या लढाईचे थ्रीडी चित्रण पाहणे हा थरारक अनुभव ठरावा, अशी अपेक्षा आहे.

हॉलीवूडमध्ये जसे चित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग म्हणून त्यातील सुपहिरोजच्या कामगिरीवर आधारित चित्रमालिकांची पुस्तकं प्रसिद्ध केली जातात, तसाच प्रयोग तानाजीच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. अमर चित्रकथाची तानाजी विशेष आवृत्ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याची पहिली झलक काजोल आणि अजय देवगणने समाजमाध्यमांवर शेअर केली आहे. चित्रपट क्षेत्रातल्या अंधश्रद्धा तर सर्वज्ञात आहेत. तानाजी या शब्दाच्या मूळ स्पेलिंगमध्ये बदल करत त्यात समाविष्ट करण्यात आलेला ‘एच’ किती लाभदायी ठरणार, हेदेखील आजमावता येणार आहे.

इतर चित्रपटांच्या तुलनेत ऐतिहासिक चित्रपटाची भट्टी जमवून आणणं काहीसं कठीण असतं. जो काळ आपण पाहिला, अनुभवलेला नाही, त्याचं काल्पनिक चित्र केवळ ऐतिहासिक दाखले आणि संदर्भाच्या आधारे तयार करणं, इतिहासात नमूद केलेल्या घटनांशी कोणतीही विसंगती निर्माण होऊ न देता त्या प्रसंगांतलं नाटय़ पडद्यावर उभं करणं, त्यातील व्यक्तिरेखांचा अवमान होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेणं हे मोठं आव्हान असतं. ओम राऊत आणि त्यांच्या टीमला ते पेलता आलं आहे की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:11 pm

Web Title: ajay devgan tanhaji kajol kondhana sinhagad
Next Stories
1 समृद्ध करणारा सिनेमाचा अनुभव आयनॉक्सचे ‘मेगाप्लेक्स’
2 बाजीप्रभूंच्या यशोगाथेने पावन होणार रुपेरी पडदा
3 Aww.. So Cute! विराटने पोस्ट केला अनुष्कासोबतचा रोमँटिक फोटो
Just Now!
X