News Flash

आता हिंदीमध्ये सुद्धा येणार ‘दृश्यम २’ चा रीमेक, पुन्हा झळकणार अजय-तब्बूची जोडी

मेकर्सनी खरेदी केले हक्क

तुम्हाला अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट आठवत असेल, जो सुपरस्टार मोहनलाल स्टारर मल्याळी फिल्मच्या पहिल्या पार्टचा हिंदी भाग होता. आता अजय देवगणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘दृश्यम’ मधून चौथी नापास केबल ऑपरेटरच्या भूमिकेतून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा सिक्वेलमध्ये म्हणजेच ‘दृश्यम २’ मध्ये आपला जलवा दाखवणार आहे.

‘दृश्यम’ हिंदी चित्रपटात कथेचा सस्पेन्स कायम ठेवल्यानंतर पुढचा सिक्वेल ‘दृश्यम २’ हा मल्याळी भाषेनंतर हिंदीमध्ये सुद्धा येणार आहे. काही दिवसांपुर्वीच याची घोषणा करण्यात आलीये. प्रसिद्ध निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी पॅनरोमा स्टूडिओज इंटरनॅशनलकडून चित्रपटाच्या हिंदी रीमेकचे हक्क खरेदी केले आहेत.

अजय आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘दृश्यम’ हा मुळात मल्याळम अभिनेते मोहनलाल स्टारर ‘दृश्यम’ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. मल्याळम आणि हिंदी भाषेतला ‘दृश्यम’ सुपरहीट ठरल्यानंतर मल्याळम भाषेतला ‘दृश्यम २’ हा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला.

आधीच्या चित्रपटाप्रमाणेच यंदाही मल्याळी प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद देत ‘दृश्यम २’ सुपरहीट ठरला. हाच सस्पेन्स आणि थ्रीलर घेऊन हिंदीमधल्या सिक्वेलमध्ये अभिनेता अजय देवगण कधी भेटीला येणार, अशी चर्चा सगळीकडेच सुरू होती. हिंदी भाषेतल्या ‘दृश्यम २’ ची घोषणा निर्मांत्यांनी काही दिवसांपुर्वीच केली असली तरी त्यात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बूची जोडी दिसणार का ? हे मात्र निर्मात्यांनी आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवलं होतं. तसंच चित्रपटातल्या स्टारकास्टची नावं देखील जाहीर केली नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

परंतू या चर्चांवर पूर्णविराम लागला असून तब्बू आणि अजय हेच पुन्हा एकदा सिक्वेलमध्ये दिसणार असून दोघांनीही या ‘दृश्यम २’ साठी होकार दिला आहे. 2021 च्या शेवटी या चित्रपटाचे शूटिंग सुरुवात होणार असून 2022 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 5:24 pm

Web Title: ajay devgan will be seen in the hindi remake of drishyam 2 prp 93
Next Stories
1 ‘मी सर्जरी केली नाही’, शमा सिकंदरने केला खुलासा
2 अनिकेतच्या परतण्याने मानसीला मिळणार बळ, ‘पहिले न मी तुला’ एका वेगळ्या वळणावर
3 अभिनेत्री उपासना सिंह विरोधात पोलिसात तक्रार दाखल
Just Now!
X