News Flash

Anniversary Special: काजोलने अजयकडेच केली होती बॉयफ्रेंडची तक्रार अन्..

जाणून घ्या अजय आणि काजोलची लव्हस्टोरी...

Anniversary Special: काजोलने अजयकडेच केली होती बॉयफ्रेंडची तक्रार अन्..

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल बी-टाउनमधील अतिशय लोकप्रिय कपल आहेत. आज २४ फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाचा २२वा वाढदिवस आहे. काजोल आणि अजयने १९९९ साली लग्न केले होते. दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.

अजय आणि काजोलची पहिली भेट १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कजोलने तिची लव्हस्टोरी सांगितली होती. ‘मी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तयार झाले होते आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांना चित्रपटात माझ्यासोबत हिरोची भूमिका कोण साकारणार आहे असे मी विचारत होते. कोणीतरी अजयकडे इशारा केला. तो एका कोपऱ्यात बसला होता. त्यानंतर चित्रपटाच्या सेटवर आमच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले’ असे कजोल म्हणाली.

काजोल पुढे म्हणाली, ‘जेव्हा मी अजयच्या आयुष्यात आले तेव्हा तो दुसऱ्या मुलीला डेट करत होता. तसेच मी देखील माझ्या बॉयफ्रेंडची तक्रार त्याच्याकडे करायची. त्यानंतर काही दिवसांनंतर माझा ब्रेकअप झाला. आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलेले नाही. पण आम्ही एकत्र असल्याचे आम्हाला वाटायचे.’

अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते. काजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातील देखील लग्नासाठी तयार झाले. त्यांनी १९९९मध्ये लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. अजय आणि काजोलच्या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 10:24 am

Web Title: ajay devgn and kajol 21st wedding anniversary avb 95
Next Stories
1 ‘बिग बॉस’फेम अली गोनी- जास्मीन भसीन बांधणार लग्नगाठ?
2 शिवणकाम करून आई चालवायची घर; संजय लीला भन्साळींची संघर्षमय प्रवास
3 उर्वशी रौतेलाच्या जॅकेटची किंमत माहिती आहे का? तेवढ्या पैश्यात होईल युरोप ट्रिप
Just Now!
X