News Flash

प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय ‘गोलमाल-५’

'गोलमाल' मालिकेतील चौथा भाग 'गोलमाल अगेन' हा एक हॉरर विनोदीपट होता.

अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर अशी जबरदस्त स्टारकास्ट असलेल्या गोलमाल या विनोदीपट मालिकेचा पाचवा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘गोलमाल’च्या पाचव्या भागाचे चित्रीकरण सुरु करणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी इन्स्टाग्रामवरुन या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. ‘गोलमाल’ मालिकेतील चौथा भाग ‘गोलमाल अगेन’ हा एक हॉरर विनोदीपट होता. ‘गोलमाल-५’ मध्येही प्रेक्षकांना असेच काहीसे कथानक पाहायला मिळणार असे म्हटले जात आहे. सध्या या चित्रपटाची पटकथा व संवादावर काम सुरु आहे. पुढल्या वर्षी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर लगेचच रोहित शेट्टी ‘गोलमाल-५’चे चित्रीकरण सुरु करणार आहे.

अजय देवगण आणि रोहित शेट्टीची जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक-अभिनेत्यांच्या जोड्यांपैकी म्हणून म्हणून ओळखली जाते. दोघांनी मिळून आतापर्यंत ११ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. रोहितच्या आगामी सूर्यवंशी या चित्रपटामध्ये देखील अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. पुढच्या वर्षी ‘गोलमाल-५’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 2:42 pm

Web Title: ajay devgn and rohit shetty back with golmaal 5 mppg 94
Next Stories
1 दीपिकाची सवत कोण? अर्जुन कपूरने केला खुलासा
2 हॉलिवूड अभिनेत्रीने नरेंद्र मोदींना पत्र पाठवून केलं ‘हे’ आवाहन
3 #HyderabadHorror: ‘छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय”, सुबोध भावेचा संताप
Just Now!
X