News Flash

मला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार – अजय देवगण

मुंगडा गाण्याच्या रिक्रिएटमुळे लता मंगेशकर नाराज झाल्या होत्या

अजय देवगण

धमाल फ्रेंचाइजीमधील तिसरा पार्ट ‘टोटल धमाल’ शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये झळकली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने देखील ‘मुंगडा’ गाण्याच्या रिक्रिएटवर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. मात्र या गाण्यामुळे चित्रपटाच्या टीमला अनेक दिग्गजांचा रोषाला सामोरं जावं लागलं.  ‘मुंगडा’ गाण्याचं रिक्रिएट केल्यामुळे संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचाही समावेश होता. लताजी यांनी नाराजी व्यक्त करत ‘ आमच्या कोणत्याही गाण्याचं रिक्रिएट करताना आमची परवानगी घेतली जात नाही’ असं म्हटलं होतं. त्यानंतर आता अजय देवगण याने लताजी यांच्या वक्तव्यावर त्याचं मत मांडलं आहे.

“आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये जुन्या गाण्याचं रिक्रिएट करण्यात आलं आहे. कलाविश्वातील ज्येष्ठ गायकांच्या गाण्याला कोणी असा नवा टच दिला तर तर त्यांना राग येणं किंवा वाईट वाटणं सहाजिकचं आहे. ‘मुंगडा’ गाण्याचं रिक्रिएट केल्यानंतर लताजी आणि संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांची ही नाराजी मला मान्यही आहे. त्यांच्या भावना मी समजू शकतो. मात्र त्यांना दुखाविण्याचा माझा किंवा माझ्या टीमचा कोणताच हेतू नव्हता. लताजी यांना आमच्यामुळे झालेल्या त्रासामुळे मी त्यांची मनापासून माफी मागतो”, असं अजय म्हणाला.

पुढे तो असंही म्हणतो, “लताजी यांना जर वाईट वाटलं असेल तर त्यांनी बिनदिक्कतपणे माझ्या कानशिलात लगवावी. मला त्याचं काहीच वाईट वाटणार नाही. त्या वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि त्यामुळे मला मारण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे. त्या मला ओरडूदेखील शकतात. पण एक खरं आहे, जर त्यांना वाईट वाटलं असेल तर मी मनापासून त्यांची माफी मागायला तयार आहे”.

दरम्यान, १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुंगडा’ या गाण्यामध्ये अभिनेत्री हेलन झळकली होती. उषा मंगेशकर यांचा स्वरसाजाने नटलेलं हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. त्यामुळे टोटल धमालमध्ये त्याचं रिक्रिएट करण्यात आलं. या नव्या गाण्यामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकली. मात्र हे नवं गाणं म्हणावं तसं प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलं नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 11:04 am

Web Title: ajay devgn apologise to lata mangeshkar total dhamaal recreate mungda
Next Stories
1 चित्र रंजन : नावापुरती ‘डोंबिवली’ असलेला रंजक थरारपट
2 सामूहिक विवाह सोहळ्यात अभिनेता अक्षय कुमारकडून ७९ जोडप्यांना ७९ लाखांची भेट
3 मायकल जॅक्सन माहितीपट : HBO वाहिनीवर १०० मिलियन डॉलरचा दावा
Just Now!
X