News Flash

अजय देवगणची बॉलिवूडमध्ये पंचवीशी

अभिनयासोबतच अजय देवगणने चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही त्याचे नशीब आजमावले.

अजय देवगण

बॉलिवूडमध्ये कलाकार त्यांच्या चित्रपटांतून आणि त्यांच्या कलेतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. पण याच मनोरंजनाच्या जोरावर बऱ्याच वर्षांसाठी प्रेक्षकांच्या मनामध्ये हक्काचं स्थान निर्माण करण्याचे आव्हानही या कलाकारांसमोर असते. सध्याच्या दिवसांमध्ये बी टाऊनमध्ये विविध कलाकार नव्याने पदार्पण करत आहेत. पण, त्यांच्या या स्पर्धेतही काही अभिनेते मात्र अभिनयाच्या आणि चित्रपटांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करुन आहेत. त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे अजय देवगण. अभिनेता अजय देवगणच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही अजय देवगण ट्रेण्डमध्ये आहे. ’25 Years Of Ajay Devgn’ ट्विटरवर ट्रेण्डमध्ये आहे.

‘फूल और कांटे’, ‘दिलवाले’, ‘सुहाग’, ‘दिलजले’, ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटांपासून ते अगदी हल्ली हल्लीच्या ‘शिवाय’ या चित्रपटापर्यंत विविध धाटणीच्या भूमिकांमधून अजय देवगण प्रेक्षकांसमोर आला आहे. अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि मानाच्या फिल्मफेअर पुरस्कारावरही अजच्या नावाची मोहोर उमटली आहे. ‘गंगाजल’, ‘युवा, ‘सिंघम’, ‘वन्स अपॉन अ टाईन इन मुंबई’, ‘ओमकारा’ या चित्रपटातील अजय देवगणच्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.

अभिनयासोबतच अजय देवगणने चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही त्याचे नशीब आजमावले. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘शिवाय’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये २५ वर्षांची कारकिर्द यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या अजय देवगणकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही.

सध्या अभिनेता अजय देवगण त्याच्या आगामी चित्रपट ‘बादशाहो’च्या निमित्ताने चर्चे आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, इम्रान हाश्मी, ईशा गुप्ता, विद्युत जामवाल आणि इलियाना डिक्रूज हे कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:04 pm

Web Title: ajay devgn completed his 25 years in bollywood
Next Stories
1 मानधनाच्या बाबतीत हेमा मालिनी यांची दीपिका-प्रियांकाला टक्कर
2 ‘फिटनेस गुरू’च्या वाढदिवसाला पोहचले सेलिब्रिटी शिष्य
3 ‘त्या’ अफवांवर अभिषेकने दिला पू्र्णविराम
Just Now!
X