News Flash

अमिताभ बच्चन- अजय देवगण ७ वर्षांनी एकत्र!

जाणून घ्या, बिग बी- अजयच्या आगामी चित्रपटाचं नाव

‘मेजर साहब’, ‘खाकी’ किंवा ‘सत्याग्रह’ हे चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असतील. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि अजय देवगण हे दोन दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, या चित्रपटानंतर ही जोडी फारशी एकत्र दिसली नाही. मात्र, लवकरच ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ७ वर्षानंतर बिग बी आणि सिंघम एकाच प्रोजेक्टवर काम करणार आहेत.

आपल्या अभिनयाची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अजय लवकरच ‘मेडे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे यात बिग बी मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच चित्रपटाचं दिग्दर्शन करत असतानाच अजयदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

दरम्यान, या चित्रपटात अजय एका वैमानिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर बिग बी नेमकी कोणती भूमिका साकारतील हे मात्र गुलदस्त्यात आहे. डिसेंबरमध्ये या चित्रपटाचं हैदराबादमध्ये चित्रीकरण करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 3:43 pm

Web Title: ajay devgn direct amitabh bachchan his next titled mayday ajay essay pilots role dcp 98
Next Stories
1 दोन गटातील गोळीबारात प्रसिद्ध गायकाचा मृत्यू
2 अभिनेत्री पल्लवी पाटीलचा ‘जिगरबाज’ अंदाज लवकरच
3 Ashram 2 : ‘आम्ही कायदेशीर नोटीस पाठवलीच नाही’; करणी सेनेचं स्पष्टीकरण
Just Now!
X