26 March 2019

News Flash

‘काजोलमध्ये तेवढी हिंमत नाही’

काजोलला त्याच्या कामात कोणतीच कमतरता दिसत नाही

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. सध्या तो त्याचा आगामी रेड सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमात अजय एका इनकम टॅक्स अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत इलियाना डिक्रुझचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अजयने नुकतेच एका मुलाखतीत म्हटले की, त्याच्या कामाचे खरे समीक्षण त्याची मुलगी न्यासा करते. काजोलला त्याच्या कामात कोणतीच कमतरता दिसत नाही, पण मुलगी न्यासा मात्र त्याच्या कामात काय आवडले नाही ते सांगते.

नुकताच ‘रेड’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अगदी कमी वेळात हा ट्रेलर लाखोवेळा पाहण्यात आला आहे. एका मुलाखतीत जेव्हा अजयला, काजोल तुझ्या कामांवर प्रश्न उपस्थित करते का? असा प्रश्न विचारला तेव्हा अजयने उत्तर देताना म्हटले की, ‘नाही, तिच्यात एवढी हिंम्मत नाही. पण माझी मुलगी मात्र मला अनेक प्रश्न विचारते.’ यावेळी अजयने त्याच्या आयुष्यात महिलांचे काय स्थान आहे याबद्दलही सांगितले.

तो म्हणाला की, ‘मी कर्तृत्ववान महिलांमध्ये लहानाचा मोठा झालो हे माझं भाग्य आहे. माझी आई आणि दोन बहिणींशिवाय मी इथवर पोहचू शकलो नसतो. त्यांच्यासोबतच आज माझ्याबरोबर काजोलही आहे. ती स्वतःच्या पायावर उभी आहे. न्यासाही स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या मार्गावर आहे. मी सर्व महिलांचा आदर करतो. या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, महिला या आधीपासूनच कणखर असतात याची पुरूषांना आठवण करुन दिली पाहिजे.’ राज कुमार गुप्ता दिग्दर्शित रेड सिनेमा १६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

First Published on March 6, 2018 1:58 am

Web Title: ajay devgn said kajol doesnt have guts to criticise me but daughter nysa devgn does