27 November 2020

News Flash

बॉलिवूडचा सिंघम ‘या’ आजाराने त्रस्त

उपचारासाठी अजय परदेशात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अजय देवगण

अभिनेता अजय देवगण टेनिस एल्बोच्या आजाराने त्रस्त असून त्याला शूटिंगवरही लक्ष केंद्रीत करता येत नाही. या आजारामुळे त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असूनही तो शूटिंग थांबू देत नसल्याची माहिती समोर येत आहे. लव रंजन प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत निर्मिती होणाऱ्या एका रोमकॉम चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या अजय व्यग्र आहे.

या शूटदरम्यान प्रत्येक शॉटनंतर त्याला प्रचंड वेदना होत आहेत. टेनिस एल्बोमुळे होणाऱ्या वेदनांमुळे त्याला कॉफीचा कपदेखील उचलणं कठीण झालं आहे. मात्र अशा परिस्थितीतही तो शूट करत आहे. आपल्याला टेनिस एल्बोचा त्रास होत असल्याचं त्याने सहकलाकार तब्बू आणि रकुलप्रीत यांनाही जाणवू दिलं नाही. त्याचप्रमाणे शूटिंग रद्द केल्यास किंवा पुढे ढकलल्यास पुन्हा सर्व कलाकारांच्या तारखा जुळून येणार नाहीत, याचा विचार करत अजयने शूटिंग सुरू ठेवले.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात रंगणार ‘तुझी माझी जोडी’चा खेळ

‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला या आजाराबाबत कळलं. त्यावेळी सहकलाकार अनिल कपूर यांनी त्याला उपचारासाठी जर्मनीला जाण्याचा सल्ला दिला होता. कारण काही काळापूर्वी अनिल कपूरदेखील त्या आजाराने त्रस्त होते. त्यावेळी त्यांनी जर्मनीतच टेनिस एल्बोवर उपचार घेतले. आता अजयसुद्धा उपचारासाठी जर्मनीला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 6:53 pm

Web Title: ajay devgn suffering from tennis elbow and experiencing acute pain
Next Stories
1 आधी संन्यास, मग लग्न, आता घटस्फोट, सोफियानं पतीला काढलं घराबाहेर
2 ‘मिस हवाहवाई’च्या जीवनप्रवासासाठी ‘या’ तीन नावांना पसंती?
3 खुशीच्या फोनच्या वॉलपेपरवरील श्रीदेवी यांचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल
Just Now!
X