News Flash

२२ वर्षानंतर अजय-संजय लीला भन्साळी एकत्र, ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये साकारणार भूमिका

यापूर्वी त्यांनी १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात एकत्र काम केले होते

बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २४ फेब्रुवारीला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली. टीझरमधील आलियाचा हटके लूक, तिचा अभिनय या सर्वाच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एण्ट्री झाली आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अभिनेता अजय देवगण देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात अजय आणि आलियाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. अजय लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

चित्रपटातील अजयच्या सीनसाठी एक मोठा सेट क्रिएट करण्यात आला आहे. अजय आणि संजय लीला भन्साळी यांनी १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता जवळपास २२ वर्षांनंतर ते पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील टप्पे चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केलाय. गंगूबाई काठियावाडी हे पात्रं भन्साळींना हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून भेटलं आहे. गंगूबाई कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. मूळच्या गुजरातच्या असलेल्या गंगूबाईंनी अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमात पडून विवाह केला आणि मुंबईत पळून आल्या. मात्र त्यांच्या पतीने त्यांना केवळ ५०० रुपयांसाठी वेश्या व्यवसायात ढकललं.

कामाठीपुरातच वेश्या व्यवसाय करत असताना गंगूबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लाला यांच्याशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधली. आपल्या या बहिणीला मग करीम लालाने अवघा कामाठीपुराच हातात दिला, असे सांगितले जाते. गंगूबाईंनी हा व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधीही कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नाही. उलट, मुंबईतून वेश्या व्यवसायच काढून टाकण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाचे नेतृत्वही गंगूबाईंनी केले होते. अशा गंगूबाईंची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 10:52 am

Web Title: ajay devgn to begin shoot of gangubai kathiawadi from tomorrow avb 95
Next Stories
1 गर्लफ्रेंड सोबत राहुलची हेलिकॉप्टर राईड, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
2 तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांत तफावत
3 ‘पावरी हो रही है’ स्टाईलमध्ये रितेशने शेअर केला व्हिडीओ, पाहा व्हिडीओ
Just Now!
X