News Flash

फुटबॉल प्रशिक्षकाच्या बायोपिकमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत

फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहिम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

अजय देवगण

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्डच सुरू आहे. त्यातही क्रीडा विषयावरील बायोपिक असल्यास प्रेक्षकांकडून त्याला अधिक पसंती मिळते. क्रिकेट, हॉकी यांसारख्या खेळांवरील चित्रपट बॉक्स ऑफीसवर गाजले. आता बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चरित्रपटाची घोषणा नुकतीच झाली असून अजय त्यात फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहिम यांची भूमिका साकारणार आहे. अमित शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

‘फिफा वर्ल्ड कप’चा माहौल देशात असताना फुटबॉल खेळावर आधारित या चित्रपटाची घोषणा अत्यंत योग्य वेळी केली आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘झी स्टुडिओज’कडून ट्विटरवर यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. १९५०- १९६३ या कालावधीत सय्यद अब्दुल रहिम भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. हा काळ भारतीय फुटबॉलचा सुवर्णयुग मानला जातो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने १९६२च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर १९५६मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच मेलबर्न ऑलिम्पिक फुटबॉल टूर्नामेंटच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. वयाच्या ५४ व्या वर्षी अब्दुल रहिम यांचं कॅन्सरमुळेनिधन झालं.

Soorma movie review: अडथळ्यांमुळे रडत बसणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा ‘सूरमा’

या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला आणि जॉय सेनगुप्ता करत असून अद्याप त्याचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. अजयसोबतच या चित्रपटात आणखी कोणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 1:24 pm

Web Title: ajay devgn to do a sports biopic will play syed abdul rahim the football coach of the indian national football team
Next Stories
1 जबाबदारीची जाणीव करुन देणाऱ्या ‘आक्रंदन’ची पहिली झलक
2 मिमोहच्या लग्नातला ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल
3 मुस्लीम आवडतात का?; वाचा सोनम काय म्हणाली..
Just Now!
X