देशातील तसंच राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. करोना व्हायरसचा अधिकाधिक प्रसार रोखता यावा यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाउनचं काटेकोरपणे पालन होताना दिसत नाहीये. पोलीस, सेलिब्रिटी सर्वांकडून नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन केलं जातंय. अशातच अभिनेता अजय देवगणने ट्विटर अकाऊंटवर भन्नाट व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जुन्या चित्रपटातील एक सीन वापरून त्याला लॉकडाउनचे संवाद देऊन हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. ‘खऱ्याखुऱ्या हिरोंनी दिलेला हा सल्ला ऐका आणि घरीच राहा’, असं अजयने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. जवळपास एक मिनिटाच्या या व्हिडीओत लॉकडाउनचं महत्त्व बॉलिवूड स्टाइलमध्ये समजून सांगितलंय.

आणखी वाचा : देशातील परिस्थितीबाबत ट्विंकल खन्नाने २०१५ मध्येच केली होती भविष्यवाणी?

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३००च्या वर गेला आहे. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी वगळता घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. अशा लोकांना सेलिब्रिटी सोशल मीडियाद्वारे घरीच राहण्याचं आवाहन करत आहेत.