News Flash

‘तान्हाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् पडला मीम्सचा पाऊस

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू येईल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात मावळ्यांचे अनन्यसाधरण महत्व आहे. याच शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आणणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. काही प्रेक्षकांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. पण आता नेटकऱ्यांनी चित्रपटावर भन्नाट मीम्स तयार केले आहेत.

एखादा चित्रपट आला आणि त्यावर नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले नाहीत हे फार क्वचितच पाहायला मिळते. नुकताच ट्रेलर प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाची देखील नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्याने तर अजय देवगण त्याच्या जाहिरातीचे प्रमोशन करत असल्याचे म्हटले आहे. हे मीम्स पाहून तुम्हाला देखील हसू येईल.

‘तान्हाजी’चित्रपटात अभिनेता अजय देवगण तान्हाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वटवणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळाते होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 12:07 pm

Web Title: ajay devgns tanhaji trailer inspires hilarious memes reminds twitter of his paan masala ad avb 95
Next Stories
1 ‘तान्हाजी’च्या ट्रेलर लाँचला पत्रकाराने तैमुरबद्दल विचारला ‘हा’ मजेदार प्रश्न, सैफ म्हणाला…
2 VIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा…
3 कलाक्षेत्रात टाकलेलं पाऊल योग्य
Just Now!
X