महाराष्ट्रात १५ दिवसांची संचारबंदी लागू झाल्यापासून अनेक मालिका आणि सिनेमांचं शूटिंग बंद करण्यात आलं आहे. अशात प्रेक्षकांच्या मनोरंजनामध्ये खंड पडू नये म्हणून अनेक वाहिन्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची स्पेशल ट्रीट घेऊन सज्ज झाल्या आहेत. मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका घेऊन येणार आहे. अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तानाजी मालुसरे हे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव. या शूरवीराने जीवाची पर्वा न करता कोंढाणा सर केला. तानाजी मालुसरेंच्या या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमातून दाखवण्यात आली आहे. हा दैदिप्यमान इतिहास आपल्या मातृभाषेत पाहायला मिळणं ही पर्वणीच म्हणायला हवं. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या आणि नंबर वन हे बिरुद कायम राखणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता हा सिनेमा मराठीतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी
या भव्यदिव्य सिनेमाविषयी सांगताना स्टार प्रवाह कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपल्या मायबोली मराठीमध्ये हा सिनेमा स्टार प्रवाहवर प्रक्षेपित करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी स्टार प्रवाह वाहिनीने आणली आहे.’

“मराठी सिनेमाच्या स्क्रीनसाठी भिका मागाव्या लागतात, ही लांछनास्पद गोष्ट”, प्रसाद ओकने व्यक्त केली खंत

अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्यासोबतच अजिंक्य देव, शरद केळकर, देवदत्त नागे आणि दिग्दर्शक ओम राऊत अशी अनेक मराठी नावं या सिनेमासोबत जोडली गेली आहेत. कलाकारांच्या उत्तम अभिनयासोबतच सिनेमातली दमदार गाणी, अजय-अतुल यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स हे सारं प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devhans tanhaji the unsung warrior will telecast first time in marathi on star pravah kpw
First published on: 17-04-2021 at 17:45 IST