24 November 2020

News Flash

‘सिंगिंग स्टार’च्या मंचावर अजय – बेला येणार तब्बल दहा वर्षांनी एकत्र

दहा वर्षांनंतर त्यांनी 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर एकत्र गाणं गायलं आहे.

अजय आणि अतुल या जोडीनं फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही आपल्या गाण्यांवर थिरकायला लावलं आहे. या अफलातून जोडीची सर्वच गाणी सुपर हीट आहेत. महाराष्ट्राची ही लाडकी जोडी आता सोनी मराठी वाहिनीच्या ‘सिंगिंग स्टार’च्या मंचावर येतेय.

बेला शेंडे ही ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात परीक्षक आहे. अजय आणि बेला यांनी तब्बल दहा वर्षांपूर्वी ‘मथुरेच्या बाजारी’ हे गाणं एकत्र गायलं होतं. त्यानंतर आज, दहा वर्षांनी त्यांनी ‘सिंगिंग स्टार’च्या मंचावर एकत्र गाणं गायलं आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले वीस दिवस ‘सिंगिंग स्टार’चं चित्रीकरण बंद होतं. पण आता ते पुन्हा सुरू झालं आहे.

‘सिंगिंग स्टार’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. येत्या १८ तारखेच्या कार्यक्रमात अजय-अतुल संगीत सोहळा हा विशेष भाग असणार आहे. या विशेष भागात स्पर्धक अजय-अतुल यांची गाणी सादर करणार आहेत. ‘सिंगिंग स्टार’ अजय-अतुल संगीत सोहळा, १८ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १२ यादरम्यान सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 2:00 pm

Web Title: ajay gogavle and bela shende singing together after ten long years ssv 92
Next Stories
1 ‘डॉक्टर डॉन’मध्ये ऐन पावसाळ्यात साजरा होणार अनोखा ‘व्हॅलेंटाईन्स डे’
2 ‘खाली पीली’मधील नवे गाणे प्रदर्शित होताच डिसलाईकचा भडीमार
3 शौविक चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ; NCBने केली खास मित्राला अटक
Just Now!
X