News Flash

“अखेर न्याय मिळाला”; तुरुंगातून सुटताच अभिनेत्याने केले ट्विट

अभिनेत्याने केले चकित करणारे ट्विट

अभिनेता एजाज खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलिकडेच त्याने आपल्या फेसबुक लाईव्ह दरम्यान धार्मिक तेढ निर्माण करणारी काही वक्तव्य केली होती. यासाठी पोलिसांनी त्याला अटक देखील केली. शुक्रवारी त्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. परंतु तुरुंगातून बाहेर येताच त्याने पुन्हा एक ट्विट केले आहे.

काय म्हणाला एजाज?

तुरुंगातून बाहेर येताच एजाजने आपल्या चाहत्यांचे आभार मानले. “माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. अखेर न्यायाचा विजय झाला. माझे वकिल नाजनीन खत्री आणि जोहेब शेख यांचे मनापासून आभार. धन्यवाद!” अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

एजाजने बुधवारी (१५ एप्रिल) रात्री १२.३० दरम्यान त्याच्या फेसबुकवरुन एक लाइव्ह व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने वादग्रस्त वक्तव्य करुन ‘कायम मुस्लीम नागरिकांनाच का दोषी धरलं जातं?, असा प्रश्न विचारला होता. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. ‘#अरेस्ट_एजाज_खान’ हा हॅशटॅगही ट्रेण्ड झाला होता. या वादग्रस्त वक्तव्यासाठी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2020 1:22 pm

Web Title: ajaz khan out on bail after getting arrested for spreading communal hatred mppg 94
Next Stories
1 बॉबी देओलचे चाहते झाले ‘बॉबियन्स’; पाहा भन्नाट मीम्स
2 नसीरूद्दीन शाह यांना लॉकडाउनमुळे सापडली घरातील ‘ती’ हरवलेली खोली
3 कॉमेडियनवर आली भाजीपाला विकण्याची वेळ; अमिताभ, धर्मेंद्र, नाना पाटेकरांची मिमिक्री करत विकतोय भाजी
Just Now!
X