News Flash

‘सापांची नव्हे माणसांची भीती वाटते’; सापासोबत खेळणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्याने दिलं सापाला जीवनदान

अभिनेता एजाज खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. तो विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील झाली आहे. मात्र यावेळी तो कुठल्याही वक्तव्यामुळे नव्हे तर चक्क एका सापामुळे चर्चेत आहे. मला सापांची नव्हे तर माणसाठी भीती वाटते, असं म्हणत तो सापासोबत खेळताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

अवश्य पाहा – “ही बाई आता काहीही बरळतेय”; अनुराग कश्यपने साधला कंगनावर निशाणा

 

View this post on Instagram

 

@amaanprehistoric

A post shared by Ajaz Khan (@imajazkhan) on

अवश्य पाहा – स्वत:च्या नावाचं फेक अकाउंट पाहून विद्युतला बसला झटका; म्हणाला…

एजाज खानने सापासोबतचा हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. पावसाळ्यात साप आपल्या बिळातून बाहेर पडू लागतात. असाच एक साप वाद्रे येथील एका सोसायटीत सापडला. या सापाला पकडण्यासाठी सर्प मित्राला बोलावण्यात आलं. हे रेस्क्यु मिशन कसं करतात? हे पाहण्यासाठी तिथे एजाज खान देखील आला होता. त्यावेळी त्याने त्या सापाला हातात घेतलं व त्याच्यासोबत तो खेळू लागला. मला सापांची नव्हे तर माणसाठी भीती वाटते, असं म्हणत त्याने सापांबद्दलचं प्रेमही व्यक्त केलं. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोण आहे एजाज खान?

एजाज खान एक टीव्ही अभिनेता आहे. त्याने या पूर्वी ‘अदालत’, ‘भाभी’, ‘केसर’, ‘कुसुम’, ‘क्या होगा निम्मो का?’ यांसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. मात्र गेल्या काही काळात तो आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत राहू लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 1:31 pm

Web Title: ajaz khan rescue snake video viral mppg 94
Next Stories
1 ‘…म्हणून मी मास्क लावला नव्हता’; ट्रोलिंगनंतर सैफने सोडलं मौन
2 आणखी एक मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश
3 ‘आता घरी परतण्याची वेळ आली’; किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोनू सूदचं आश्वासन
Just Now!
X