27 January 2021

News Flash

Video : एजाज खानला अटक करण्याची मागणी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

सोशल मीडियावर #अरेस्ट_एजाज_खान' हा हॅशटॅगही ट्रेण्ड झाला होता

कायम वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारा अभिनेता एजाज खान याला अटक करा या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे. ,देशात काहीही झालं तरीदेखील मुस्लीम नागरिकांना दोषी धरतात, असं वादग्रस्त वक्तव्य एजाज खानने केलं होतं. त्याने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत त्याचं मत मांडलं होतं. मात्र त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करत अटक करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर ‘#अरेस्ट_एजाज_खान’ हा हॅशटॅगही ट्रेण्ड झाला होता.

एजाजने बुधवारी (१५ एप्रिल) रात्री १२.३० त्या दरम्यान त्याच्या फेसबुकवरुन एक लाइव्ह व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने वादग्रस्त वक्तव्य करुन ‘कायम मुस्लीम नागरिकांनाच का दोषी धरलं जातं?, असा प्रश्न विचारला होता. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. तर काहींनी मुंबई पोलिसांकडे त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाला एजाज खान ?

‘एक लहानशी मुंगी मेली तरी मुस्लीम नागरिक जबाबदार, हत्ती मेला तरी मुस्लीम नागरिक जबाबदार, दिल्लीत भूकंप आला तरी तेच जबाबदार. हे मुस्लीम नागरिक जमिनीच्या खालती जाऊन त्यांनी जमिनी हलवली म्हणून दिल्लीत भूकंप आला. म्हणजे थोडक्यात काय तर काहीही झालं तरी मुस्लीमचं जबाबदार. पण हे कटकारस्थान कोण रचतंय माहिती आहे का? कधी याचा विचार केला आहे का तुम्ही ? करोनावरुन प्रत्येकाचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याला मुद्दाम धार्मिकतेचा रंग दिला जात आहे. त्यामुळे देशात जे असं करतायेत त्यांना सगळ्यांना करोना होवो ही इच्छा’.

दरम्यान, एजाज खानने जवळपास ९ मिनीटांचा लाइव्ह व्हिडीओ केला असून तो ६७ हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. तर अतापर्यंत त्याला २० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 10:27 am

Web Title: ajaz khans video goes viral and twitter trend arrest ajaz khan ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 जगाला संकटात टाकणाऱ्या चीनचं टिकटॉक अ‍ॅप बंद करा; अभिनेत्याची मागणी
2 ‘तबलिगींवर कधी व्यक्त होणार?’ अशोक पंडितांचा जावेद अख्तरांना खोचक सवाल
3 अभिनेते रणजीत चौधरी यांचे निधन
Just Now!
X