News Flash

Video: अन् अभिनेत्याने रागात हिसकावून घेतला चाहत्याच्या हातातील फोन

सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, अनेक कलाकारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. मतदान केंद्रावर सुपरस्टार्सना पाहून चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. सकाळी तमिळ सुपरस्टार अजित कुमार पत्नीसह मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आला. तिथे चाहत्यांनी अजितला गराडाच घातला. दरम्यान अजितने रागात चाहत्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आहे.

अजित कुमार पत्नी शालिनीसोबत मतदान करण्यासाठी ३० मिनिटे आधीच मतदान केंद्रावर पोहोचला होता. तेव्हा एक चाहता अजित जवळ गेला आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु लागला. ते पाहून अजितला इतका राग आला की त्याने रागात चाहत्याचा मोबाइल हिसकावून घेतला. पण काही वेळानंतर अजितने त्या चाहत्याला त्याचा मोबाईल परत देऊन टाकला. दरम्यान अजितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मतदान केंद्राजवळ अजितला पाहून तेथे अनेकजण जमा झाले होते. तितक्यात पोलिस तेथे आले आणि अजितला आतमध्ये घेऊन गेले. काही चाहते देखील तेथे पोहोचले. तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करा असे सांगण्यात आले होते. तरी देखील एक चाहता अजितच्या जवळ येऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. ते पाहून अजितला राग आला आणि त्याने चाहत्याच्या हातामधील फोन हिसकावून घेतला. काही वेळानंतर त्याने तो परतही केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 5:02 pm

Web Title: ajith kumar loses his cool and snatches phone from a fan at a polling booth avb 95
Next Stories
1 करोनावर मात केल्यानंतर कार्तिक आर्यनने खरेदी केली नवी कार, किंमत वाचून व्हाल थक्क
2 रविवारी ‘टॉकीज मनोरंजन लीग’ मध्ये कॉमेडीचा तडका
3 कुणाल कामरा आणि त्याचे आई वडील करोनाबाधित
Just Now!
X